Tarun Bharat

सेवक संघाच्या अध्यक्षपदी मिलींद भोसले

विद्यापीठ सेवक संघाच्या सर्वसाधारण सभेत निर्णय

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ सेवक संघाच्या अध्यक्षपदी मिलिंद भोसले यांची निवड झाली. सेवक संघाची सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. या सभेत एकमताने भोसले यांची अध्यक्षपदी निवड केली. नवीन कार्यकारिणी निवडीचे अधिकारही त्यांना दिले. सभेच्या अध्यक्षस्थानी संभाजी कांबळे होते. दिवंगत बाबा सावंत यांचे निधन झाल्याने सेवक संघाचे अध्यक्षपद रिक्त होते. या रिक्त झालेल्या जागेवर ही निवड केली आहे.

सेवक संघाच्या सभेच्या सुरूवातीला सेवक संघाचे माजी अध्यक्ष बाबा सावंत, अतुल एतावडेकर यांच्यासह निधन झालेल्या अन्य सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या सभेत अध्यक्ष व कार्याध्यक्ष निवडीसंबंधी चर्चा झाली. चर्चेअंती कार्याध्यक्ष निवडीचा विषय बाजूला पडला. मिलिंद भोसले हे सध्या पगारपत्रक लेखा विभागात सहाय्यक अधीक्षक आहेत. सेवक संघात ते सुमारे तीस वर्षे सक्रिय आहेत. सेवक संघात विविध पदावर काम केले आहे.

महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कर्मचारी महासंघावरही ते प्रतिनिधीत्व करतात. सेवक संघाचे सरचिटणीस राम तुपे यांनी सभेचे कामकाज पाहिले. यावेळी रमेश पोवार, संभाजी जगदाळे, सुरेश पाटील, विशांत भोसले, रमेश साळोखे, शशिकांत साळोखे, कपिल देसाई, शिरीष देसाई, संदीप हेगडे, शत्रुजित कोटकर, राकेश आयरे, अनिल पाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

गोकुळ शिरगाव परिसरातील चोरांचा बंदोबस्त करा

Archana Banage

कोल्हापूर : गांधीनगरमधून अकरा वर्षीय मुलाचे अपहरण

Archana Banage

उदगावात रास्ता रोको

Archana Banage

माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. संभाजीराव गोरे यांची निवड

Archana Banage

कोल्हापूर : सरकारने पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करू नये

Archana Banage

चंदगड पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल परीट निलंबित

Archana Banage
error: Content is protected !!