तरुण भारत

सेवनस्टार मॉलसमोर युवकावर हल्ला

प्रतिनिधी/ सातारा

सेवनस्टार मॉलमध्ये असणाऱया एका दुकानात मॅनेजर पदावर कार्यरत असणाऱया युवकांवर शनिवारी सायंकाळी वार झाला. आणि त्यांचे दुकानही फोडण्यात आले. या दुकानात कार्यरत असणाऱया एका महिलेला हा युवक त्रास देत असल्याच्या गैरसमजुतीतून हा प्रकार घडला. यांची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवकाला ताब्यात घेतले. ओम राजेंद्र गिरीगोसावी असे त्यांचे नाव आहे. तर जखमी युवक व्यंकटेश सुभाष त्रिंबके (वय 22, रा. गडकरआळी सातारा) याच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisements

   पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास सेवनस्टार मॉलमधील दुकानात मॅनेजर व्यंकटेश त्रिंबके हा काम करत होता. यावेळी ओम गिरीगोसावी तिथे आला. त्याने व्यंकटेशला बाहेर बोलवले. यावेळी दुकानात कार्यरत असणाऱया महिलेला का त्रास देतोस अशी विचारणा केली. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. बघता बघता हा वाद विकोपाला गेला.

राग सहन न झालेल्या ओमने दुकानात शिरून दुकान फोडायला सुरुवात केली. याला विरोध केला म्हणून जवळील धारदार शस्त्र काढले. व क्षणाचाही विचार न करता व्यंकटेशच्या गळ्यावर वार केला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. खरेदीला आलेले ग्राहक हे घाबरुन आरडाओरडा करून पळु लागले. यांची माहिती तत्काळ शहर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी शहर पोलीस दाखल झाले व त्यांनी ओम गिरीगोसावी याला ताब्यात घेतले. तर व्यंकटेशला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. त्यांच्या गळ्याला 6 टाके पडले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून लवकर त्याला घरी सोडण्यात येईल असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. ओमवर उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Related Stories

शेअरमार्केटच्या नावाखाली तिघांची फसवणूक

Patil_p

सातारा जिल्ह्यात १४३ कोरोनाबाधित, तिघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

जिल्हय़ात आशा-निराशेचा खेळ; १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

सातारा : आगाशिवनगरमध्ये घरफोडी

datta jadhav

अवैध दारु, मटका प्रकरणी सातजणांवर गुन्हे

Amit Kulkarni

वडूज येथे दीडशेहून अधिक देशी वृक्षांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Amit Kulkarni
error: Content is protected !!