Tarun Bharat

सेवाकार्यात अधिकाधिक योगदान देऊन आंबेडकर जयंती साजरी करा : देवेंद्र फडणवीस

Advertisements

प्रतिनिधी / मुंबई
येत्या 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सेवाकार्यात अधिकाधिक योगदान देऊन साजरी करावी, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भाजपा अनुसूचित जाती मोर्चा तसेच तसेच भारतीय जनता युवा मोर्चाच्या राज्य आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी दोन संवादसेतूंच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुठल्याही आपत्तीचा सर्वाधिक सामना गरिब माणसांनाच करावा लागतो. अशाप्रसंगी त्यांच्यापाठिशी ठामपणे उभे राहणे, ही आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे. त्या अर्थाने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा कार्यकर्त्यांची जबाबदारी अधिक आहे. या काळात अनुसूचित जाती मोर्चाचा पुढाकार महत्त्वाचा आहे. येत्या आंबेडकर जयंतीला अधिकाधिक सेवा कार्य करूनच महामानवाला आपल्याला आदरांजली अर्पण करायची आहे. डॉ. आंबेडकर जयंती साजरी करताना सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळूनच ती साजरी करा, असेही त्यांनी सांगितले.
भाजयुमोच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, कार्यकर्त्यांनी सेवाकार्यात अतिशय चांगला पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच आज आपण 35 लाख लोकांपर्यंत पोहोचलो आहे. कार्यकर्ते ठिकठिकाणी शिधा, भोजन, मास्क, औषधी, सॅनेटायझर इत्यादींचे वितरण करीत आहेत. या सेवाकार्यात त्यांची जबाबदारी विशेष आहे. रक्ताची कमतरता भासणार नाही, म्हणून रक्तदान तर कार्यकर्त्यांनी केलेच. शिवाय कुठली कमतरता भासू नये, म्हणून संबंधित रक्तपेढींपर्यंत रक्तदात्यांची यादी सुद्धा दिली आहे. सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे, अशी त्यांनी कार्यकर्त्यांची प्रशंसा सुद्धा केली.
महात्मा फुले जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करणार
महाराष्ट्र भाजपातर्फे महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती उद्या अनोख्या पद्धतीने साजरी करणार असून, राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांपासून ते बुथस्तरावरील कार्यकर्ते ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून जोडली जाणार आहेत.

Related Stories

तपासणीसाठी कार थांबविणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

Rohan_P

खर्डीत चोरट्यांनी फोडली दुकाने

Abhijeet Shinde

चिनी धोरणांच्या विश्लेषणकर्त्या तज्ज्ञांची भारतात कमतरता

datta jadhav

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 हजार 447 वर

prashant_c

सचिन सावंत यांचा प्रवक्तेपदाचा राजीनामा

datta jadhav

सोलापुरात आणखी तीघे कोरोना पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या 68 वर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!