Tarun Bharat

सेवानिवृत्त अभियंत्यांतर्फे अभियंता दिन साजरा

बेळगाव /प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवानिवृत्त बेळगाव स्थित अभियंता संघटनेतर्फे अभियंता दिन साजरा करण्यात आला. येथील देवांग मठात हा कार्यक्रम झाला. प्रारंभी संघटनेच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरया यांच्या प्रतिमेचे पूजन संघटनेचे बेळगाव शाखा अध्यक्ष शशिकांत साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. 

  याप्रसंगी उमेश वाळवेकर, भरत गावडे, नारायण नवखंडकर आदींनी अभियंता दिनाचे महत्त्व विशद केले. यावेळी पी. के. चौगुले, आर. व्ही. कुलकर्णी. आर. के. जमखंडी, व्ही. ए. मनगुळी, एम. ए. गुमाजी आदी अभियंते उपस्थित होते. सुरेश पाटील यांनी आभार मानले. 

Related Stories

कायद्यानुसार आम्हाला आमचे हक्क द्या!

Amit Kulkarni

मच्छेतील डुकरांचा त्वरित बंदोबस्त करा

Amit Kulkarni

गांधीनगर सर्व्हिस रस्त्यावर सांडपाण्याचे तळे

Amit Kulkarni

महागाईसह भाजपविरोधात मुस्लीम बांधवांची निदर्शने

Amit Kulkarni

अथणी, हुक्केरी येथील दोन महिलांचा कोरोनामुळे बळी

Patil_p

मोटारसायकली चोरणाऱया युवकाला अटक

Amit Kulkarni