Tarun Bharat

सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱयाच्या बंगल्यात चोरी

Advertisements

वार्ताहर/ वाठार किरोली

वाठार किरोली (ता. कोरेगाव) येथे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र पांडुरंग मिरोखे यांच्या बंद बंगल्याची डबल दरवाजाचे कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरटय़ांनी 1 लाख 77 हजार रुपये किंमतीच्या साडेतीन किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू, सी. को. कंपनीचे घडय़ाळ, किंमती कपडे-साडय़ा अज्ञात चोरटय़ांने चोरून नेले. घटनेची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तपासकामी आलेल्या ठसे तज्ञांनी ठसे घेतले असून चोरीच्या घटनेला खूप दिवस लोटल्याने शोधकामी यश मिळाले नाही.

घटनास्थळाला कोरेगाव डीवायएसपी गणेश किंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ यांनी भेट दिली. सेवानिवृत्तीनंतर डीवायएसपी रामचंद्र पांडुरंग मिरोखे (वय 72) यांनी वाठार (किरोली) येथे शेतीवाडी करण्यासाठी बंगला बांधला आहे. रामचंद्र मिरोखे हे काही कामानिमित्त दि. 5 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता कराड येथे वास्तवास असणाऱया कुटुंबाकडे राहण्यास गेले होते. ते जवळपास दीड महिन्यांनी बुधवार दि. 16 डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान परतले. बंगल्यात गेले असता अज्ञात चोरटय़ांनी वरुन आत शिरुन बंद  घराचे कडी कोयंडा तोडून एक लाख सत्याहत्तर हजार रुपये किंमतीच्या साडे तीन किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू, सी. को. कंपनीचे घडय़ाळ, किंमती कपडे- साडय़ा अज्ञात चोरटय़ांने चोरून नेल्या.  

डीवायएसपी गणेश किंद्रे यांनी तपासकामी स. पो. नि. घनशाम बल्लाळ यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. तपास हवालदार मोहन कुलकर्णी करीत आहेत.

रायफलचे राऊंड सापडल्याने निश्वास

बंद बंगल्यात शिरलेल्या अज्ञात चोरटय़ांनी सर्व कपाटातील कपडे साडय़ा इतस्तः विखुरल्या होत्या. हाती किंमती वस्तू न लागल्याने धान्यांचे डबे तपासताना सर्वत्र धान्य सांडले होते. फिर्यादीमध्ये रायफलचे राउंड चोरीला गेल्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र पोलीस तपासादरम्यान घरातच रायफलचे राऊंड सापडल्याने सेवानिवृत सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र मिरोखे यांनी समाधानाचा निश्वास सोडला.

Related Stories

सोलापूर ग्रामीण मध्ये आज 31 कोरोनाबाधितांची भर

Abhijeet Shinde

राजमाता जिजाऊंच्या जीवनचरित्राने उलगडले रंग

Patil_p

चार दिवसात रस्त्याची कामे न केल्यास रास्ता रोको

Abhijeet Shinde

कोरोनावर मात व अर्थव्यवस्था रुळावर आणणं हीच दोन मोठी आव्हानं; उपमुख्यमंत्री अजित पवार

Abhijeet Shinde

लॉजवर पोलिसांचा वॉच वाढणार कधी?

datta jadhav

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांसह चौघांवर गुन्हा दाखल

Patil_p
error: Content is protected !!