Tarun Bharat

सेव्हनस्टार निपाणी सुपरबझार चषकाचा मानकरी

प्रतिनिधी/ निपाणी

येथील अकोळ रोडवरील सोमनाथ मंदिरानजीक हाफपीच क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. यावेळी अंतिम सामन्यात निपाणीतील सेव्हनस्टार गुपच्या खेळाडूंनी कणगले संघाचा पराभव करून सुपरबझार चषकावर नाव कोरले. त्यांना रोख 21 हजार 1 व चषक तर उपविजेत्या कणगलेतील बजरंग संघास 15 हजार 1 व चषक देण्यात आला. सदर स्पर्धेत शरीफने मालिकाविराचा बहुमान पटकाविला. त्याला किरण कोरवी यांच्या हस्ते स्पोर्ट्स सायकल प्रदान करण्यात आली. तर अंतिम सामन्यात प्रवीण कणगला याला सामनाविराचा बहुमान सर्जेराव मगदूम यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी सचिन गायकवाड, सत्यवान पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघास तर महेश सूर्यवंशी व रजपूत पेंटर यांच्या हस्ते उपविजेत्या संघास बक्षीस वितरण करण्यात आले.

याप्रसंगी केदार हिरेकुडे, निखील कांबळे, किरण कोरवी, इम्रान बडेघर, रमेश मधाळे, सर्जेराव मगदूम, कन्हैय्या कांबळे, संदीप माने, गणेश कांबळे, पंकज सूर्यवंशी, शांताराम कांबळे, प्रेमदीप कारंडे, प्रल्हाद कांबळे, संदीप कारंडे, दीपक राबते, संदीप मधाळे यांच्यासह मान्यवर, खेळाडू उपस्थित होते.

Related Stories

‘मी ऊर्जिता’ कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद

Amit Kulkarni

सोमवारपासून पुन्हा शाळा सुरू

Amit Kulkarni

सोमवारपासून न्यायालये पुन्हा गजबजणार

Patil_p

खरेदीला उधाण; बाजारपेठेत तुफान गर्दी

Amit Kulkarni

बकरी ठेवण्याच्या शेडला भाडेकरू मिळणार का?

Patil_p

125 कोटी अनुदानातून उपनगरातील विकासकामे राबविण्यास प्राधान्य

Patil_p