Tarun Bharat

सेव्हेंटीन टेकर्स चव्हाट गल्लीची पन्हाळगड-विशाळगड पदभ्रमंती यशस्वी

प्रतिनिधी /बेळगाव

सेव्हेंटीन ट्रेकर्स चव्हाट गल्ली, बेळगावची पन्हाळगड, पावनखिंड ते विशाळगड पदभ्रमंती श्रीनाथ पवार यांच्या अध्यक्षतेखाली व राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पडली. प्रारंभी प्रेरणामंत्र म्हणण्यात आला. त्यानंतर पन्हाळगडावरील वीर शिवा काशीद यांच्या समाधीचे पूजन श्रीनाथ पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पन्हाळगडावरील राजदिंडीमार्गे तुरुकवाडी, म्हाळुंगे, म्हसाई पठार, पवारवाडी, उचतवाडी, धनगरवाडी, बांदिवडे येथे मुक्काम करण्यात आला.

दुसरे दिवशी खोतवाडी, मांडलाईवाडी, करपेवाडी, अंबर्डे, कळवेवाडी, म्हाळेवाडी, पाटेवाडी, धनगरवाडा, म्हसवडेमार्गे पांढरे पाणी येथे मुक्काम करण्यात आला. तिसरे दिवशी पांढरे पाणी येथे शिवछत्रपतींनी बांधलेली शिवाजी विहीर पाहून पदभ्रमंती पावनखिंडीमध्ये पोहचली. तेथे राजू शेट्टी यांनी पावनखिंडीचा रणसंग्राम कथन केला. त्यानंतर विशाळगड येथे पदभ्रमंती पोहोचली. विशाळगडावरील नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाचीप्रभू देशपांडे यांच्या समाधींचे पूजन उमेश कणबरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

ध्येयमंत्राने पदभ्रमंतीची सांगता करण्यात आली. सदर पदभ्रमंतीमध्ये गणेश जाधव, ओमकार मोहिते, गजानन पवार, प्रज्वल जाधव, कुबेर गुरव, अमर बिर्जे, युवराज भोसले, भुवन हंगिरगेकर, किसन खांडेकर, अवी पाटील या शिवभक्तांनी भाग घेतला.

Related Stories

सदाशिवनगरमधील रस्त्यावरून वाहते पावसाचे पाणी

Patil_p

मि.दसरा राज्यस्तरीय शरीरसौष्टव स्पर्धा शुक्रवारी

Amit Kulkarni

चव वाढविणाऱया मिठाच्या दरात वाढ

Patil_p

‘त्या’ अकरा जणांच्या अहवालाकडे लक्ष

Patil_p

नवी ऊर्जा घेऊन दौडची सांगता

Patil_p

रविवारी कोरोनाची 41 जणांना बाधा

Amit Kulkarni