Tarun Bharat

सैनिकांप्रती प्रेम व्यक्त करणारा रेशीम धागा म्हणजे राखी : पं.मनिषा साठे

  • सैनिक मित्र परिवारातर्फे ११ हजार राख्यांचे पूजन

ऑनलाईन टीम / पुणे :

देशातील कोणत्याही नागरिकाशी रक्ताचे नाते नसले, तरी देखील त्यांच्यासाठी देशाच्या सिमेवर रक्षणार्थ सैनिक आपले रक्त सांडतात. ऊन, वारा, पाऊस यांसह पंचमहाभूतांची पर्वा न करता येईल ते संकट अंगावर झेलून कार्यरत असतात. त्यामुळे सैनिकांप्रती प्रेम व्यक्त करणारा राखीसारखा रेशीम धागा आपण सिमेवरील सैनिकांसाठी पाठविणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत ज्येष्ठ नृत्यगुरु पं. मनिषा साठे यांनी व्यक्त केले.


सैनिक मित्र परिवार, लायन्स क्लब व सहयोगी संस्थांच्यावतीने राखी पौर्णिमेनिमित्त देशाच्या सिमेवर लढणा-या जवानांसाठी पुणेकरांतर्फे ११ हजारपेक्षा जास्त राख्या व शुभेच्छा पत्रे पाठविण्यात आली. अखिल मंडई मंडळाच्या समाजमंदिरात झालेल्या कार्यक्रमात मनिषा साठे यांच्या हस्ते राखीपूजन झाले. यावेळी लायन्स क्लबचे प्रांतपाल हेमंत नाईक, शेखर शेठ, सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ आदी उपस्थित होते. सैनिकांसाठी विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्र, पत्र व राख्या पाठविण्यात आल्या.


हेमंत नाईक म्हणाले, देशवासियांकडून मिळालेल्या राख्या व पत्रांतून सैनिकांप्रती असलेला प्रेमभाव व्यक्त होतो. राखीचा धागा किंवा पत्रातील शब्द जरी लहान असले, तरी ते सैनिकांसाठी हे प्रेरणा देणारे असते. सामान्य नागरिकांकडून मिळणारी ही प्रेमाची भेट आली की त्यांच्यामध्ये उत्साह व आनंद द्विगुणीत होतो, असेही त्यांनी सांगितले. 


आनंद सराफ म्हणाले, समाजाच्या कृतज्ञतेचा प्रत्यय सैनिकांना करुन देण्यासाठी व त्यांनाही सण-उत्सव साजरा करता यावा, याकरीता सन १९९८ पासून हा सातत्याने राबविण्यात येत आहे. यामधून सैनिकांना आनंद व उर्जा मिळावी, असा आमचा प्रयत्न आहे. देशाच्या कच्छ, सियाचीन, आसाम, बंगाल आदी १५० सिमाभागांत प्रत्येक रेजिमेंटमध्ये या राख्या पाठविल्यानंतर तेथे पूजन करुन त्या सैनिकांपर्यंत पोहोचविल्या जातात. अनेकदा सैनिकांकडून राख्यांना उत्तर म्हणून पत्र आणि भेटवस्तूदेखील पुणेकरांना पाठविल्या जातात, असेही ते म्हणाले. गिरीष पोटफोडे, राजश्री शेठ, कल्याणी सराफ, वंदना मोहिते, प्रा.संगिता मावळे यांसह विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.

Related Stories

‘ग्लोबल वॉर्मिंग’चे महाआव्हान

Patil_p

सोने-चांदीची झळाळी उतरली !

prashant_c

4 वर्षीय मुलाला 7 भाषा अवगत

Patil_p

21 व्या शतकातील ‘श्रावण बाळ’

Patil_p

कोरोना योद्ध्यांच्या हस्ते यंदा श्री महालक्ष्मी मंदिरात प्रतिष्ठापना

Tousif Mujawar

आधी लस, नंतर वरात

Patil_p