Tarun Bharat

सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांनी दिले सीपीआरला पीपीई किट

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या मुलांच्यासाठी पन्हाळा व कसबा बावडा कोल्हापूर येथे दोन वसतीगृह आहेत. सदर वसतीगृहात राहून आपले शिक्षण पूर्ण करून आज देशात व परदेशातही अनेक क्षेत्रात येथील विद्यार्थी कार्यरत आहेत. शिवगड बॉईज या व्हॅाट्सअॅप ग्रुप च्या माध्यमातून राजा शिवछत्रपती परिवाराचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आशिष उर्फ दत्ताजीराव घोरपडे यांनी कोरोना विरुद्धच्या या लढाईत आपले योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला. लगेच मित्रपरिवाराने आपले आर्थिक योगदान सुरू केले.

दोन – तीन दिवसात जवळजवळ 42 हजार रुपये संकलित झाले. वसतीगृहाचे माजी विद्यार्थी व सध्या सी.पी.आर. कोल्हापूर येथे कार्डिओलॉजिस्ट असलेले डॉ. विदुर कर्णिक यांनी पी.पी. ई. किट भेट देण्याचा मनोदय व्यक्त केला. उपलब्ध संकलित निधीच्या माध्यमातून लगेच सर्वसंमतीने साठ पी.पी.ई.किट खरेदी केले व राजश्री शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.मीनाक्षी गजभिये यांच्या उपस्थितीत सीपीआर प्रशासनाला दिले. यावेळी डॉ विदुर कर्णिक सर, कार्डियाक सर्जन डॉ. मुल्ला,श्री. बंटी सावंत साहेब, कोल्हापूर महानगपालिकेच्या दिव्यांग सेलचे समन्वयक राजू अपुगडे उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे सहा बळी, ३६७ रूग्ण

Archana Banage

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल करून आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्यास केली अटक

Archana Banage

बालेकिल्ल्यात शिवसैनिकांची नव्याने मोट बांधण्याचे आव्हान

Abhijeet Khandekar

‘ओपन’च्या शक्यतेने बाजार गेट बनला ‘हॉटस्पॉट’!

Archana Banage

पोक्सो गुन्हय़ातील आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

Patil_p

इचलकरंजी येथील डॉ. बन्ने यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नगरसेवकाच्या मुलगा, जावाईसह चौघांविरोधी गुन्हा दाखल

Archana Banage