प्रतिनिधी / सैनिक टाकळी
सैनिक टाकळी ( तालुका शिरोळ) येथील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गावात भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. या व्यक्तीच्या संपर्कातील नातेवाईकांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या गावात प्रथमच पॉझिटिव्ह रुग्ण झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने अति दक्षता म्हणून तो एरिया शील करण्यात आला आहे. आणि गावातून निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे. वात गर्दी होऊ नये आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गावात अत्यावश्यक सेवा वगळता तीन दिवसाचा लॉकडाउन जाहीर केला आहे.

