Tarun Bharat

सैन्यप्रमुखांचा ऐतिहासिक दौरा आजपासून

सौदी अरेबिया, युएईच्या दौऱयाकरता रवाना

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सैन्यप्रमुख एम.एम. नरवणे मंगळवारी सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातच्या दौऱयावर रवाना झाले आहेत. भारताच्या सैन्यप्रमुखांचा या दोन्ही देशांसाठीचा हा पहिलाच दौरा ठरणार आहे.  भारतीय सैन्यानुसार जनरल नरवणे सर्वप्रथम संयुक्त अरब अमिरातमध्ये पोहोचणार आहेत. ते 12 डिसेंबरपर्यंत तेथे असतील. 13 आणि 14 डिसेंबर या कालावधीत त्यांचा सौदी अरेबिया दौरा पार पडणार आहे. या दौऱयादरम्यान सैन्यप्रमुख दोन्ही आखाती देशांच्या सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱयांना भेटणार आहेत. या देशांसोबतचे सैन्यसंबंध बळकट करण्यासंबंधी चर्चा होणार आहे.

जनरल नरवणे हे सौदी अरेबियाच्या रॉयल सौदी लँड फोर्स आणि जॉइंट फोर्स मुख्यालयाला भेट देणार आहेत. किंग अब्दुल अजीज मिलिट्री अकॅडमीचाही ते दौरा करणार आहेत. सौदी अरेबियाच्या नेशन डिफेन्स युनिवर्सिटीचे विद्यार्थी तसेच कर्मचारीवर्गाला सैन्यप्रमुख भेटणार आहेत.

अत्यंत महत्त्वपूर्ण

पाकिस्तानचे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातसोबतचे संबंध बिघडत चालले आहेत. काश्मीर मुद्दय़ावर दोन्ही देशांनी पाकिस्तानला साथ देण्यास नकार दिला आहे. तसेच ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनच्या बैठकीत पाकिस्तानच्या मागण्यांना त्यांनी वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या आहेत. पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट असतानाही सौदी अरेबियाने त्याला कर्जाची परतफेड करण्यास सांगितले आहे. तर संयुक्त अरब अमिरातने पाकिस्तानी नागरिकांना नव्याने व्हिसा देण्यास नकार दिला आहे. सौदी अरेबियाची नाराजी दूर करण्यासाठी पाकिस्तानी सैन्यप्रमुख बाजवा यांनी अनेक दौरे केले असले तरीही कुठलाच लाभ झालेला नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यप्रमुखांचा दौरा भारतासोबतच्या दोन्ही देशांचे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

संरक्षणक्षेत्र निर्मितीत भागीदारी

भारत आणि सौदी अरेबियाचे संबंध मागील काही वर्षांमध्ये वृद्धिंगत झाले आहेत. सौदी अरेबियाने भारतासोबत मिळून संरक्षण उत्पादनांची निर्मिती करण्यास रुची दर्शविली आहे. सैन्यप्रमुख सौदीच्या अधिकाऱयांसेबत या मुद्दय़ावर चर्चा करू शकतात. सौदी अरेबिया हा चीन, अमेरिका आणि जपाननंतर भारताचा चौथ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार आहे. सौदी अरेबिया हा भारताला इंधनाचा पुरवठा करण्याच्या दृष्टीकोनातूनही महत्त्वपूर्ण आहे. भारतात सुमारे 18 टक्के कच्च्या तेलाची आयात सौदी अरेबियातूनच होते.

Related Stories

पॅन-आधार जोडणीला 31 मार्च अंतिम मुदत

Patil_p

4 पायांच्या प्राण्यांमध्ये चालते अनोखे कुटुंब

Patil_p

बिहार-झारखंडचे माजी राज्यपाल राम जोइस यांचे निधन

Archana Banage

‘पईसावालाके होअत बा कोरोना’

Patil_p

अधिवेशनाला 10 फेब्रुवारीपासून प्रारंभ

Patil_p

पोटनिवडणुकीतही भाजपची घोडदौड

Patil_p