Tarun Bharat

सोनगावमध्ये बिबट्याने केल्या कोंबड्या फस्त

Advertisements

प्रतिनिधी / सातारा :

सातारा शहराच्या जवळच असलेल्या सोनगाव येथे अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. परंतु गेल्या दोन दिवसांमध्ये बिबटय़ाने सोनगाव येथील कदमवस्तीतील दहा कोंबडय़ांचा फडशा पाडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गोठ्यातील गुरे वाचली. याबाबत वनविभागाला कळवले असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोनगाव, कुरणेश्वर, शाहुनगर या भागात बिबटयाचे अनेकदा दर्शन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पाळीव कुत्र्यांवर हल्ले झाल्याच्या बाबीही सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी सोनगाव येथील प्रवीण कदम यांच्या वस्तीवर असलेल्या पाच कोंबड्यांची जाग्यावरच पिसे पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र, त्यावेळी त्यांनी एवढी चौकशी केली नाही. परंतु शनिवारी रात्री पुन्हा बिबटया आला अन् त्याने खुराडय़ातील पाच कोंबडय़ावर डल्ला मारल्याने सगळा प्रकार समोर आला. बॅटरीच्या प्रकाशझोतात प्रवीण कदम यांनी पाहिले तर बिबटया. त्यानंतर त्यांनी लाईट लावून आवाज करत त्याला हाकलून लावले. दरम्यान या प्रकाराने परिसरात दहशतीचे वातावरण झाले आहे. याची माहिती कदम यांनी वनविभागाला दिली आहे.

Related Stories

सातारा जिल्हय़ात प्रत्यक्ष उपचारार्थ फक्त 1 हजार 286 रुग्ण

Abhijeet Shinde

सातारा : किराणा दुकानाला आग, १५ लाखांचे नुकसान

Abhijeet Shinde

सातारा पालिकेची तब्बल 7 महिने सर्वसाधारण सभाच नाही

Patil_p

दिव्यनगरीत अज्ञातांनी दुचाकी पेटवून दिल्या

Amit Kulkarni

सातारा विकास आघाडीतच रणकंदन

Patil_p

जावळीकर अभियंता सचिनच्या प्रतीक्षेत

datta jadhav
error: Content is protected !!