Tarun Bharat

सोनाराला लुटणाऱया चौघांना केले जेरबंद

Advertisements

लुटीतील 17 लाख 83 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत

प्रतिनिधी/ सातारा, म्हसवड

माण तालुक्यातील म्हसवड येथील सोनाराला लुटलेला जबरी चोरीचा गुन्हा  उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 17 लाख 83 हजार 780 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. 28 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 जुलै 2022 रोजी साडे पाच वाजण्याच्या सुमारास म्हसवड येथील सोनार दुचाकीवरून कासारवाडी (ता. माण) गावच्या हद्दीतून म्हसवड ते माळशिरस रस्त्याने जात असताना म्हसवड येथील श्री फार्म हाऊसच्या जवळ दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवरून येऊन सोनाराच्या दुचाकीला धडक दिली होती. त्यानंतर सोनाराला नकली पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्या जवळील 15 लाख 62 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या गंभीर गुह्याची दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली पथक गठीत केले होते. पथकाने सातारा व सोलापूर जिह्यात जाऊन गोपनीय माहिती प्राप्त केली. त्याचप्रमाणे फिर्यादी सोनार ये-जा करणाऱया मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. दरम्यान हा गुन्हा म्हसवडमधील एका सोनाराने त्याच्या साथीदारामार्फत केला असल्याची गोपनीय माहिती तपास पथकाला मिळाली.

या माहितीच्या आधारे अधिक तपास केला असता म्हसवडमधील संबंधित सोनाराने त्याच्या माळशिरस (जि. सोलापूर) तसेच धुळदेव आणि म्हासाळवाडी (ता. माण) येथील साथीदारांसह गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. खात्रीशीर माहिती मिळतात दि. 21 सप्टेंबर रोजी दूर्वा उर्फ दुर्योधन नाना कोळेकर (वय 40), रणजीत भाऊ कोळेकर (वय 20 दोघेही रा. धुळदेव, ता. माण), योगेश तुकाराम बरडे (वय 35, रा. पिलीव रोड, बरडेवस्ती, माळशिरस, ता. माळशिरस), रामदास विठ्ठल गोरे (वय 20 रा. म्हासाळवाडी, ता. माण) या चार जणांना माळशिरस, सोलापूर, म्हसवड या विविध ठिकाणांवरून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 14 लाख 58 हजार 230 रुपये किमतीचे सोने, गुह्यात वापरलेली सुझुकी कार, दुचाकी, नकली पिस्तूल व चाकू असा एकूण 17 लाख 83 हजार 780 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. चौघांनाही अटक करून म्हसवड येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दि. 28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

या कारवाईत पोलीस अंमलदार उत्तम दबडे, संतोष सपकाळ, शरद बबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश कापरे, निलेश काटकर, विक्रम पिसाळ, मोहन पवार, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, सचिन ससाणे आदींनी सहभाग घेतला.

Related Stories

महाराष्ट्र : मागील 24 तासात 161 पोलिसांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने 7 जणांचा मृत्यू, 172 नवे रुग्ण

Archana Banage

खाणीत मृतदेह सापडलेल्या ‘त्या’ युवकाचा खूनच

Patil_p

उध्दव ठाकरे गटाला दिलासा ; महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता घटनापीठाकडे!

Abhijeet Khandekar

जरंडेश्वर कारखान्यावर आयकरचा छापा

Amit Kulkarni

जिल्हय़ात अंमली पदार्थाचा पुरवठा!युवापिढी बरबाद

Amit Kulkarni
error: Content is protected !!