Tarun Bharat

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटय़ा ठार

सोनाळी येथील घटना : नर जातीचा होता बिबटय़ा

वार्ताहर / वैभववाडी:

तालुक्यातील कुसूर- कुंभारी रस्त्यावर सोनाळी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटय़ा जागीच ठार झाला. हा बिबटय़ा नर जातीचा असून सुमारे आठ ते नऊ वर्षाचा असावा, असे वनविभागाकडून सांगण्यात आले. तसेच ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कुसूर- कुंभारी मार्गावरील सोनाळी येथे रस्त्यानजीक बिबटय़ा मृतावस्थेत पडला असल्याची माहिती एका व्यक्तीने सोनाळी पोलीस पाटील राजेंद्र रावराणे यांना दिली. त्यानुसार रावराणे यांनी ही माहिती वैभववाडीचे वनपाल वाघरे यांना दिली. वाघरे हे वनरक्षक किरण पाटील, उत्तम कांबळे, वनमजूर पाताडे, मराठे यांच्यासमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वस्तुस्थितीची पाहणी केल्यानंतर पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकारी डॉ. अंभी, डॉ. कांबळे यांना घटनास्थळी पाचारण केले. बिबटय़ाला गंभीर दुखापत झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात वाहनाच्या धडकेत या बिबटय़ाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱयांनी व्यक्त केला. बिबटय़ाचे विच्छेदन केल्यानंतर बिबटय़ाचा मृतदेह करुळ चेकनाका येथे आणून तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Stories

सांगेली कनिष्ठ महाविद्यालयाच्या तिन्ही शाखांचा निकाल शंभर टक्के

Anuja Kudatarkar

सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांचा सन्मान

NIKHIL_N

गुहागरात विजेचा शॉक लागून शिक्षकाचा मृत्यू

Patil_p

पूररेषेविरोधात दाखल झाल्या 13,300 हरकती!

Patil_p

गणित संशोधन विद्यापीठाची निर्मिती करा!

NIKHIL_N

मालवणात अधिकृत वाळू उत्खनन सुरू;तहसीलदारांची माहिती

Anuja Kudatarkar