Tarun Bharat

सोनिया अन् राहुल गांधी यांना नोटीस

Advertisements

नवी दिल्ली 

 दिल्ली उच्च न्यायालयाने नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या कनिष्ठ न्यायालयातील सुनावणीला स्थगिती देत सोमवारी आरोपी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेप्रकरणी नोटीस बजावली आहे. स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कनिष्ठ न्यायालयाने सोनिया गांधी, राहुल तसेच इतरांच्या विरोधात खटला चालविण्याची अनुमती देण्यास नकार दिला होता. तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुरेश कैत यांनी सोनिया, राहुल, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा तसेच यंग इंडियाला 12 एप्रिलपर्यंत स्वामी यांच्या याचिकेप्रकरणी भूमिका मांडण्यास सांगितले आहे. 12 एप्रिल रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. यापूर्वी मागील वर्षी 29 मे रोजी अंमलबजावणी संचालनालयाने नॅशनल हेराल्ड प्रकरणी पंचकूला येथील 64.93 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. तर एप्रिल 2019 मध्ये झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाकडून सोनिया आणि राहुल यांना याप्रकरणी दिलासा मिळाला होता. न्यायालयाने नॅशनल हेराल्ड हाउस रिकामे करविण्याच्या आदेशाला तूर्तास स्थगिती दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 28 फेब्रुवारी 2019 रोजी दिलेल्या एका आदेशात नॅशनल हेराल्ड हाउस रिकामी करण्यास सांगितले होते.

Related Stories

कंटेन्मेंट झोनमधील विद्यार्थ्यांना दहावी परीक्षा नाही

Rohan_P

आता सैनिकांच्या जॅकेटमधूनही गोळय़ा सुटणार

Patil_p

कोरोनाशी मिळून सामना करू : पंतप्रधान

prashant_c

एमएसपी होती, आहे अन् राहील !

Patil_p

सीबीएसईचे 2022 साठी नवे धोरण घोषित

Patil_p

देशात ३० जूनपर्यंत निर्बंध कायम

Patil_p
error: Content is protected !!