Tarun Bharat

सोनिया गांधींनी बोलावली विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार उपस्थित


नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. येत्या २० ऑगस्टला ही बैठक होणार आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत संसदेत केंद्र सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांची एकता आणखी बळकट करण्यावर चर्चा होईल.

सोनिया गांधी यांनी बंगाल आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली.

विरोधक एकजूट आहेत. २० ऑगस्टला काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या बैठकीला उपस्थित राहतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

Related Stories

मेजर जनरल पातळीवर चीनसोबत चर्चेला प्रारंभ

Patil_p

‘अजिंक्यतारा’ सलग चौथ्यांदा बिनविरोध

Patil_p

लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण राजकीय हेतूने प्रेरित- खासदार अधीर चौधरी

Abhijeet Khandekar

ट्रम्प यांच्या समर्थनार्थ हजारो नागरिक रस्त्यावर

datta jadhav

दिलासादायक! उत्तर प्रदेशात कोरोना संसर्गाचा दर 0.94 टक्क्यांवर

Tousif Mujawar

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केले प्लाझ्मा दान

Tousif Mujawar