नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
केंद्रातील भाजप सरकारविरोधात पुढील राजकीय रणनिती आखण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज विरोधी पक्षातील नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. आज सायंकाळी ४ वाजता ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत.
केंद्र सरकार आणि सत्ताधारी भाजपला घेरण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीए. आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी आज विरोधी पक्षातील नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीला ४ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह विरोधी पक्षांचे मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. याशिवाय देशातील विरोधी पक्षाची भूमिका बजावणारे अनेक नेते सहभागी होणार आहेत.


previous post