Tarun Bharat

‘सोनी सब’ वर पुन्हा एकदा ऑफिस ऑफिस

मुस्सद्दी लाल त्रिपाठी ऊर्फ सामान्य माणसाची भूमिका साकारणारे पंकज कपूर आणि ऑफिस स्टाफ उषा मॅडमच्या भूमिकेत आसावरी जोशी, शुक्लाच्या भूमिकेत संजय मिश्रा, पटेलच्या भूमिकेत देवेन भोजानी, भाटियाच्या भूमिकेत मनोज पाहवा, पांडेजीच्या भूमिकेत हेमंत पांडे आणि टिनाच्या भूमिकेत ईवा ग्रोव्हर हे पुन्हा एकदा गाजलेल्या ‘ऑफिस ऑफिस’ या मालिकेच्यानिमित्ताने एकत्र दिसणार आहेत. ही जुनी गाजलेली मालिका सोनी सब वाहिनीवर सुरू झाली आहे. सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6 आणि रात्री 10.30 वाजता ही मालिका प्रसारित होते.

ऑफिस ऑफिस मुस्सदीलाल आणि त्यांच्या संघर्षांच्या अवतीभोवती फिरते. त्याला त्रासदायक, पण मनोरंजनपूर्ण आणि अद्वितीय पात्रे असलेल्या कर्मचाऱयांनी भरलेल्या एका कार्यालयामधून त्याचे काम करून घेण्यासाठी नोकरशाही अडथळय़ांचा सामना करावा लागतो. 2001 मध्ये प्रसारित करण्यात आलेल्या या मालिकेने हलक्या-फुलक्या स्वरुपात तयार करण्यात आलेल्या एपिसोडिक कथा सादर केल्या. प्रत्येक पात्रासाठी भूमिका परिपूर्णपणे लिहिण्यात आल्या होत्या. त्यांचे ट्रेडमार्क तकिया कलाम्स, जसे उषा मॅडमचे वही तो आणि पटेलजीचे दो बातें खूपच लोकप्रिय ठरले होते.

Advertisements

भाटियाची भूमिका साकारणारे मनोज पाहवा म्हणाले, ही मालिका ज्यांना आवडली होती, ते जुन्या काळाला निश्चितच उजाळा देतील आणि ज्यांनी ही मालिका पाहिली नसून फक्त मालिकेबाबत ऐकले होते, त्यांना आता मालिका पाहायला मिळणार आहे. पटेलची भूमिका साकारणारे देवेन भोजानी म्हणाले, मला खूप आनंद झाला आहे, कारण माझ्या दोन मालिका भाखरवडी आणि ऑफिस
ऑफिस आता सोनी सब या एकाच चॅनेलवर प्रसारित केल्या जाणार आहेत. 2001- 2002 दरम्यान ही मालिका केली होती, त्यावेळी प्रतिसाद उत्तम होता. जवळपास 2 दशकांनंतर ही मालिका पुन्हा एकदा प्रसारित होणार आहे.

ही मालिका आजही त्या काळाप्रमाणेच संबंधित आहे. एका सामान्य माणसाला भ्रष्टाचारी कर्मचाऱयांच्या कार्यालयांमध्ये महत्त्वाचे काम करून घेण्यासाठी कराव्या लागणाऱया संघर्षांना या मालिकेमध्ये दाखवण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये संपूर्ण जग तणाव, वेदना आणि दुःखाचा सामना करत असताना ऑफिस ऑफिसचे पुनर्पसारण त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवत त्यांच्या चेहऱयांवर हास्य आणेल.

उषा मॅडमची भूमिका साकारणाऱया आसावरी जोशी म्हणाल्या, दोन दशकांनंतर आम्ही सोनी सबच्या प्रेक्षकांसाठी परतत आहोत. सध्या आपण अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक काळाचा सामना करत आहोत. हा काळ सर्वांसाठी सुखःकारक आणि आनंददायी करण्यासाठी ऑफिस ऑफिस मालिका पुन्हा तुम्हाला हसवण्यासाठी येत आहे. या मालिकेसाठी शूटिंग सुरू करण्याला 20 वर्षांहून अधिक काळ उलटून गेल्याचे वाटतच नाही. ऑफिस ऑफिस मालिकेचे सर्व प्रतिभावान कलाकार रंगभूमीमधून होते आणि माझ्या मते एखाद्या प्रकल्पासाठी रंगभूमी कलाकार एकत्र येतात तेव्हा जादू घडून येते.

Related Stories

26 जानेवारीला झळकणार ‘अटॅक’

Patil_p

सोनम कपूरचे डिजिटल पदार्पण

Patil_p

वडील -मुलाच्या नात्याला अधोरेखित करणारा पोरगं मजेतय

Patil_p

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर झळकणार वेल डन बेबी

Patil_p

उरी सैन्यतळावर विक्की कौशल

Patil_p

नव्या गाण्यात शिवानी बावकर- नितीश चव्हाण एकत्र

Patil_p
error: Content is protected !!