Tarun Bharat

सोने-चांदीची झळाळी उतरली !

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

सोने खरेदी करणाऱयांसाठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचं मूल्य घसरल्यामुळे सोन्याच्या किंमतीतही आज विक्रमी घसरण पाहायला मिळाली. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे आजचे भाव प्रति तोळा 388 रुपयांनी घसरले.

दरम्यान, ही सोन्याच्या किंमतीत झालेली फेब्रुवारी महिन्यातील सगळय़ात मोठी घट आहे. तसेच आज चांदीच्या किंमतीत ही प्रति किलो 346 रुपयांची घसरण झाली आहे.

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा 41 हजार 658 रुपयांवरुन घसरुन 41 हजार 270 रुपयांवर पोहोचले आहेत. आज सोन्याच्या भावात 388 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. औद्योगिक क्षेत्रात मागणी कमी झाल्यामुळे चांदीच्या किंमतीत घट झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात प्रति किलो चांदीची किंमत 47 हजार 426 रुपयांवरुन 47 हजार 80 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

 

Related Stories

विराट – अनुष्काने एक लहान मुलाच्या उपचारासाठी जमा केले 16 कोटी

Tousif Mujawar

22 वर्षीय युवती दफनभूमीची रक्षक

Amit Kulkarni

1 फेब्रुवारीपासून गोमंतकीयांना कॅसिनो मध्ये जाण्यास बंदी

Patil_p

हात-पाय गमावले, जिद्द कायम

Patil_p

गारठलेल्या चिनी सेनेकडून ‘माईंड गेम’चा अवलंब

Patil_p

…तर त्यांना माझ्या मृतदेहावरून जावं लागेल : ममता बॅनर्जी

prashant_c
error: Content is protected !!