Tarun Bharat

सोने-चांदी दरात घसरण सुरूच

Advertisements

मुंबई / वृत्तसंस्था

भारतीय सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोने-चांदीच्या दरात शुक्रवारीही बदल पाहायला मिळाले. गुरुवारच्या तुलनेमध्ये शुक्रवारी सोन्याचा भाव घसरल्यानंतर मुंबईत प्रतितोळय़ाचा भाव 46 हजार 240 रुपयांपर्यंत खाली आला आहे. तसेच चांदी दरातही घसरण झाली असून प्रतिकिलोमागे 60 हजार 600 रुपये मोजावे लागत आहेत.

सराफ बाजारातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, नजिकच्या काळात सोन्याच्या किंमती आणखी खाली येऊ शकतात. गेल्या वषी ऑगस्ट महिन्यात शेअर मार्केट पडल्यानंतर लोकांनी सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे सोन्याचा दर प्रतितोळा 56 हजार 200 रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्या तुलनेमध्ये सोने सध्या 10 हजारांनी स्वस्त झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण होत असून तिसऱया दिवशीही भाव कमी होताना दिसला. भाव कमी होत असल्याने ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत असून ज्वेलर्समध्ये गर्दी पाहायला मिळत आहे.

Related Stories

अनेक वस्तू-सेवांवरील जीएसटीत वाढ आज होणार अधिकृत घोषणा

Patil_p

कोरोना चाचणीसाठी एक कोटी ‘किट’

Patil_p

काही राजकीय पक्षांकडून शेतकऱयांची दिशाभूल

Patil_p

हिमाचल प्रदेश : ‘या’ चार जिल्ह्यात नाईट कर्फ्यू

Rohan_P

“देशाचा प्रत्येक नागरिक शेतकऱ्याबरोबर”

Abhijeet Shinde

‘नागरिकत्वा’संबंधी केंद्राचा मोठा निर्णय

Patil_p
error: Content is protected !!