Tarun Bharat

सोने पॉलिश करुन देणाऱया भामटा गजाआड

प्रतिनिधी/ सातारा

सोने-चांदी पॉलिश करून देतो असे सांगून त्यातून सोने हातचालाखीने काढून लोकांची फसवणूक करणाऱया एका परप्रांतियास शहर पोलिसांनी अटक केली आहे. राहूल कुमार साह (वय 20, रा. समेली राज्य बिहार) असे त्याचे नाव आहे. अशा अमिषाला बळी न पडता सोने-चांदी पॉलिश करण्याचे बहाण्याने कोणी मिळून आल्यास यांची माहिती पोलीस ठाण्यात देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील कोडोली, विद्यानगर या ठिकाणी राहूल कुमार साह व त्याचा साथीदाराने घरामधील महिलेस सोने-चांदी पॉलिश करतो असे सांगून त्यांच्याकडून पितळेची चांदीची भांडी एका विशिष्ट द्रव्याने पॉलिश करून दिली. त्यावरून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून सोन्याच्या बांगडय़ा पॉलिश करण्यास घेऊन त्यादेखील एका विशिष्ट द्रव्यामध्ये ठेऊन त्या काही वेळानंतर बाहेर काढून एका कागदामध्ये गुंडाळून दिल्या. व त्या थोडय़ा वेळानंतर कागदातून बाहेर काढण्यास सांगून तेथून राहूल व साथीदाराने पळ काढला. या महिलेला शंका आल्याने त्यांनी लगेच कागदात गुंडाळून दिलेल्या बांगडय़ांवर लाल रंगाचे आवरण दिसून आले. आपली काहीतरी फसवणूक झाली असल्याची शंका त्यांना आल्याने त्यांनी सोनाराकडे जाऊन सदर बांगडय़ांची तपासणी केली. त्यातील सोन्याच्या वजनात घट आल्याचे दिसून आले. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी डी. बी. पथकातील पोलीस उपनिरीक्षक समीर कदम व पथकाला दिल्या. त्यानुसार  अशा प्रकारची फसवणूक करणाऱया परप्रांतिय युवक हा शहर परिसरामध्ये आल्याची गोपनिय माहिती डी. बी. पथकाला मिळाली. पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु अधिक कौशल्यपूर्ण तपास केल्याने त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडे केमीकलयुक्त साहित्य मिळून आले. त्याने साथीदारासोबत सातारा, सांगली, सोलापूर अशा जिह्यामध्ये अशा प्रकारे फसवणूक केल्याचे गुन्हे केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अन्य साथीदारांचा शोध सुरू असून अधिक तपास पोलीस हवालदार अरूण दगडे व डी. बी. पथक करीत आहे.

Related Stories

सोयाबीन खरेदीत अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदान

Archana Banage

को – 265 जातीच्या ऊसाची नोंद न घेतल्यास गाळप परवाना नाही

Archana Banage

साताऱयातून शिवस्वराज्य दिनानिमित्ताने भव्य शोभायात्रा

Patil_p

शाहूनगरसाठी नळ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित

Patil_p

पडळकरांच्या बगलबच्च्यांना घरात घुसून मारू

datta jadhav

सातारा : माजी सैनिकाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून अवमान

datta jadhav