Tarun Bharat

सोनोलीच्या महिलांचा बेळगुंदी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा

वार्ताहर/ किणये

रोजगार हमीच्या योजनेतील सोनोली गावच्या महिलांची मजुरी न दिल्यामुळे या महिलांनी बेळगुंदी ग्राम पंचायतीवर सोमवारी सकाळी धडक मोर्चा काढला.  थकीत असलेली मजुरीची बिले ग्राम पंचायतीने त्वरित जमा करावी, अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली.

बेळगुंदी ग्राम पंचायतीच्या हद्दीमध्ये सोनोली गावातील महिलांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम केले होते. मात्र या कामाची मजुरी त्यांना अद्यापही देण्यात आलेली नाही. ग्राम पंचायतीकडे अनेक वेळा मागणी करून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला.

क्रांती फौंडेंशनच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटलेली आहे. रोजगार हमीतून काम करूनही त्याची मजुरी मिळालेली नसल्यामुळे महिला वर्ग हतबल झाल्या आहेत. यामुळेच सोमवारच्या मोर्चात महिला आक्रमक झालेल्या दिसून आल्या.

यावेळी क्रांती फौंडेशनच्यावतीने ग्राम पंचायत पीडीओ कविता वाघे यांना निवेदन देण्यात आले. रोजगार हमीची कामे सुरू असताना दुसऱया पीडीओs होत्या. त्यानंतर मी आलो यामुळे पीडीओची बदली झाल्यामुळे थकबाकी शिल्लक आहे.   याची सविस्तर माहिती मी वरि÷ांना कळविन व थकीत बिले देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन सध्याच्या पीडीओ कविता वाघे यांनी उपस्थित महिलांना आश्वासन दिले. अशी माहिती क्रांती फौंडेशनचे सचिव बळवंत लोहार यांनी दिली.

 यावेळी क्रांती फौंडेशनचे अध्यक्ष शिवप्रसाद पाटील, उपाध्यक्ष गिरीधर पाटील,  परशराम झंगरुचे, यल्लाप्पा झंगरुचे, गंगाराम झंगरुचे, सुभाष झंगरुचे व सोनोली गावातील महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

Related Stories

फुलांची उधळण करत उद्या खासबाग येथे होणार रंगपंचमी

Amit Kulkarni

हेस्कॉम विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

Patil_p

स्वच्छता कामगारांना मास्कचे वितरण

Patil_p

खानापूर म. ए. समितीत एकी घडवा

Patil_p

विद्या भारती जिल्हास्तरीय शैक्षणिक व क्रीडा संमेलन उत्साहात

Amit Kulkarni

मनपा कर्मचाऱयांनी वाचवला वासराचा जीव

Omkar B