Tarun Bharat

सोन्याच्या दागिन्यासाठी तीन वृद्ध महिलांचा खून केल्याचे उघड

Advertisements

दापोली/प्रतिनिधी

दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे संक्रांतीच्या दिवशी उघडकीस आलेल्या तीन वयोवृद्ध महिलांचा मृत्यू हा जळून झालेला नसून त्यांचा दागिन्यांच्या हव्यासापोटी अज्ञाताने खून केल्याचे आता पोलीस तपासात पुढे आले आहे. यामुळे सुशिक्षितांचा दापोली तालुका पुन्हा एकदा हादरला असून वयोवृद्ध नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दापोली पोलिसांनी याबाबत चोरीचा गुन्हा देखील नोंदवला असून तीन महिलांच्या अंगावरील दागिने मिळून 1 लाख 62 हजार 150 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेल्याचे पोलीस स्थानकात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये सत्यवती पाटणे, पार्वती पाटणे व रुक्मिणी पाटणे यांच्या डोक्यात प्रहार करून या नंतर त्यांना पुरावा नष्ट करण्यासाठी जाळण्याचा प्रयत्न झाला असल्याचा पोलिसांचा कयास आहे. याचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शशीकिरण काशीद हे करत आहेत.

Related Stories

देशातील स्वच्छ शहरांमध्ये इंदौर पुन्हा अव्वल स्थानी ; नवी मुंबईचा तिसरा क्रमांक

Rohan_P

राजापूर पंचायत समिती सभापती लाड यांचा राजीनामा

Abhijeet Shinde

शिवकालीन विहीरीतील गुढ आकृत्या जतन करण्याची आवश्यकता

Patil_p

शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

Amit Kulkarni

टॅंकरचालकाच्या बचावासाठी 7 तासांचे रेस्क्यू ऑपरेशन

Patil_p

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या साधणार जनतेशी संवाद

prashant_c
error: Content is protected !!