Tarun Bharat

सोमय्यांसाठीचा जिल्हा बंदी आदेश रद्द

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

भाजप नेते माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या आज, मंगळवारी जिल्हा दौर्यावर येत आहे. त्यांच्या दौर्याने जिह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याची खात्री झाली आहे. त्यामुळे डॉ. सोमय्यांसाठी यापूर्वी लागू केलेला जिल्हा बंदी आदेश रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी रात्री काढले.

आदेशात म्हंटले आहे की, सोमय्या यांना संबंधित राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून विरोध होणार नाही. याबाबत कागल व मुरगूड पोलीस ठाण्याकडून अहवाल आला आहे. तसेच जिल्हा विशेष शाखेकडूनही गोपनीय अहवाल आला आहे. त्यावरुन डॉ. सोमय्या यांच्या दौर्यात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही असे स्पष्ट झाले आहे. तसेच भाजपच्या पदाधिकार्यांनीही त्यांच्याकडून इतर संबंधित पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विरोध होणार नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे डॉ. सोमय्या यांच्यासाठी 19 सप्टेंबरला लागू केलेला जिल्हा बंदी आदेश रद्द करण्यात आला आहे.

Related Stories

सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोमवारपूर्वी ॲपवर रब्बी हंगाम माहिती भरावी – जिल्हाधिकारी

Abhijeet Khandekar

मतदार यादी नोंदीसाठी व्होटर हेल्पलाईन ॲपचा वापर करा – जिल्हाधिकारी

Archana Banage

सातारा : कोरोना पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण जयंती कार्यक्रम तात्पुरता तहकूब

Archana Banage

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला 1.4 बिलियन डॉलरचे अतिरिक्त कर्ज

prashant_c

बार्शीत रुग्ण वाढले, आज ६ पॉझिटिव्ह

Archana Banage

उद्धव ठाकरे खासगीत बोलले तरी मला कळतं – नारायण राणे

Archana Banage
error: Content is protected !!