Tarun Bharat

सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दापोलीत तणाव

निलेश राणे देखील येणार, पोलीस बंदोबस्तात केली वाढ

Advertisements

दापोली प्रतिनिधी

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या उद्या 26 मार्च रोजी होणाऱ्या दापोली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दापोलीत कमालीची तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. शिवाय किरीट सोमय्या यांच्या सोबत भाजपचे माजी खा. व प्रदेश सरचिटणीस डॉ. निलेश राणे हे देखील येणार असून आपल्याला कोण अडवतो तेच पहातो अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. दोन्ही बाजूनी ताठर भूमिका घेतल्याने आज दापोलीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यामुळे पोलिस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्वीट करून पालकमंत्री अनिल परब यांच्या मुरुड येथील बेकायदा रिसोर्टबाबत 26 मार्च रोजी चलो दापोली असा नारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ते दापोली येत आहेत. किरीट सोमय्या 26 रोजी दापोलीत आले तर त्यांना अडवणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी जाहीर केली आहे.

Related Stories

कुपवाडच्या सुपूत्राची दक्षिण कोरियात अभिमानास्पद कामगिरी

Sumit Tambekar

भारतीय संत साहित्याचा प्रचार जगभर करा; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आवाहन

Sumit Tambekar

दोन तासात होणार ओमायक्रॉनचे निदान

datta jadhav

दोन महिन्यात अंबानीची संपत्ती 28 टक्क्मयांनी घटली

Patil_p

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या गर्व्हनिंग कौन्सिलपदी रमेश आरवाडे यांची निवड

Sumit Tambekar

‘सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या अर्धवट ऑक्सिजन प्लॅन्टचे काम पूर्ण करा’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!