Tarun Bharat

सोमर्डी आरोग्य केंद्रात रुग्णांना चांगली सेवा द्या – आ. शिवेंद्रसिंहराजे; सिव्हील सर्जन डॉ. गडीकर यांना केल्या सुचना


सातारा/ प्रतिनिधी

कोरोना महामारीमुळे संपुर्ण जनजीवन संकटात सापडले आहे. जावली तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ भागात असणार्‍या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून रुग्णांना वेळेत उपचार मिळणे अत्यावश्यक आहे. सोमर्डी आरोग्य केंद्रात उपचार न झाल्याने सर्पदंश झालेल्या एका मुलाला प्राण गमवावे लागले ही बाब गंभीर आणि संतापजनक आहे. सोमर्डी आरोग्य केंद्रामध्ये पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी ठेवा आणि रुग्णांना तातडीची आणि चांगली सेवा द्या, अशा सक्त सुचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांना केल्या.

जावली तालुक्यातील भोगवली मुरा येथील एका मुलाला सर्पदंश झाला. त्याला ग्रामस्थांनी तातडीने सोमर्डी आरोग्य केंद्रात नेले. मात्र तिथे उपचारासाठी टाळाटाळ करण्यात आली आणि सातार्‍याला न्या ,असा बेजबाबदारपणाचा सल्ला देण्यात आला. वेळेत उपचार न झाल्याने त्या मुलाला प्राण गमवावे लागले. सोमर्डी आरोग्य केंद्रामध्ये अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसतात. त्याठिकाणी मनमानी सुरु असून आरोग्य केंद्राचा रुग्णांना काहीही फायदा होत नाही, अशा तक्रारी सोमर्डी परिसरातील ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केल्या. यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा रुग्णालयात जावून डॉ. गडीकर यांची भेट घेतली आणि चर्चा केली. यावेळी जावली पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे, संदीप परामणे, बाजार समितीचे माजी उपसभापती जयदीप शिंदे, सोमर्डीचे सरपंच संतोष शेलार, रवीदादा परामणे, बामणोलीचे सरपंच पांडूरंग तरडे, आखाडेचे सरपंच ज्ञानेश्‍वर शेलार, मनोज परामणे, समीर आतार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आरोग्य केंद्र हे त्या भागातील लोकांना तातडीची आरोग्यसेवा देण्यासाठी आहेत. मात्र रुग्णांवर वेळेत उपचार होत नसतील तर आरोग्य केंद्रांचा उद्देश काय? असा प्रश्‍न करतानाच आ. शिवेंद्रसिंहराजे यांन सोमर्डी आरोग्य केंद्रात तातडीने वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी, अशी सुचना डॉ. गडीकर यांना केली. तसेच नियुक्त करण्यात येणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांनी पुर्णवेळ आरोग्य केंद्रात हजर रहावे आणि रुग्णांना दर्जेदार सेवा द्यावी. कोणताही रुग्ण उपचाराविना राहू नये, याची खबरदारी घ्यावी, अशी सक्त सुचना केली. सोमर्डी आरोग्य केंद्रात तातडीने कर्मचार्‍यांची नियुक्ती करा. यापुढे ग्रामस्थांच्या तक्रारी येवू नयेत, याची खबरदारी संबंधीत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घ्यावी, अशी सक्त ताकीदही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीत दिली. डॉ. गडीकर यांनी सोमर्डी आरोग्य केंद्रातील रिक्त जागांवर तातडीने अधिकारी, कर्मचारी नियुक्त करुन त्यांना पुर्णवेळ हजर राहण्याबाबत सुचना देतो असे सांगितले. यापुढे ग्रामस्थांना कोणताही त्रास होवू नये आणि कोणतीही अडचण येवू नये, याची काळजी आरोग्य विभागाने घ्यावी, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

Related Stories

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 4 पोलिसांचा मृत्यू; आणखी 346 कोरोनाबाधित

Tousif Mujawar

सावधान, दंड वाढलाय नियम मोडू नका विठ्ठल शेलार

Patil_p

सातारा जिल्ह्यात नवीन १८ पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

प्राथमिक आरोग्य केंद्रास हुतात्मा जवानांची नावे देण्याची मागणी

Patil_p

ZP पोटनिवडणुकीत खासदार गावितांचा मुलगा पराभूत

datta jadhav

डिसेंबर महिन्यात ग्रामीण भाग कोरोनामुक्तीकडे

datta jadhav