Tarun Bharat

आजपासून गजबजणार सोलापूरची बाजारपेठ

Advertisements

सर्व दुकाने पूर्णवेळ उघडण्यास परवानगी; हॉटेल, मॉल़, सलूनला 50 टक्क्यांचे बंधन

प्रतिनिधी/सोलापूर

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोलापूर शहरातील लॉकडाऊन उठवले आहे. सर्व प्रकारची दुकाने पूर्णवेळ उघडण्यास परवानगी मिळाली आहे. हॉटेल, चित्रपटगृहे, मॉल, सलुन दुकाने यांना 50 टक्क्यांची क्षमता बंधनकारक आहे.

सोलापूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी यासाठी व्यापारी, राजकीय नेत्यांनी महापालिकेसमोर आंदोलने केली. महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडून पाठपुरावा केला. सोलापूर शहराला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता मिळाल्यानंतर लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय आयुक्त पी. शिवशंकर यांनी घेतला आहे. रविवारी सकाळी अनलॉक संदर्भातील आदेश आयुक्तांनी काढला आहे. शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आाहे. दुकानदारांनी कोरोना चाचणी बंधनकारक असल्याचे आदेशात म्हटले आहे.

इनडोअर खेळांना पहाटे 5 ते सकाळी 9 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 अशी वेळ दिली आहे. आऊट डोअर खेळांना पूर्ण दिवस परवानगी असेल. दोन्ही ठिकाणी प्रेक्षकांना परवानगी नाही. विवाह समारंभाला 50 व्यक्तींची तर अंत्यसंस्काराला 20 व्यक्तींची मर्यादा असेल. जमावबंदी आदेश लागू असणार आहे. जीम, सलून दुकाने, ब्युटी पार्लरला ग्राहकांची वेळ आधी निश्चित करुन 50 टक्के क्षमतेने चालू करण्यास परवानगी असेल.

नियमीतपणे चालू

– सर्व प्रकारची दुकाने, सार्वजनिक ठिकाणे, मोकळी मैदाने, खासगी आणि शासकीय कार्यालये, नेमबाजी, बांधकाम, कृषी विषयक दुकाने, ई& कॉमर्स, माल वाहतूक, कार, बसचा प्रवास, कारखाने, उद्योग.

50 टक्के क्षमतेने चालू

– मॉल, चित्रपटगृहे, नाटÎगृहे, उपहारगृहे, सामाजिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम, सहकारी संस्थांच्या बैठका, सभा.

Related Stories

सोलापूर : शेततळ्यात बुडून कर्देहळ्ळीतील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

Abhijeet Shinde

माजी महापौर विठ्ठल जाधव विरुद्ध फसवणुकीचे चार गुन्हे

Sumit Tambekar

सोलापूर ग्रामीणमध्ये शनिवारी 192 रुग्ण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

सोलापूर : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ३६ विषयांना मंजूरी

Abhijeet Shinde

तडवळेसह धामणगाव बंधारा खचला, प्रवासी मार्ग बनला धोकादायक

Abhijeet Shinde

काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्षपदी आमदार प्रणिती शिंदे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!