Tarun Bharat

सोमवारपासून द.कोरियामध्ये फुटबॉल हंगामाला प्रारंभ

वृत्तसंस्था/ सेऊल :

जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना दक्षिण कोरियामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून कोरियन सरकारने केलेल्या अथक प्रयत्नामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या आटोक्यात आली आहे. अशा परिस्थितीत दोन महिन्याच्या विलंबानंतर कोरियातील फुटबॉल हंगामाला सुरुवात होत आहे. स्थानिक के-लीगमधील सामने सेऊलमध्ये खेळवण्यात येणार आहेत. यासाठी सरकारने काही नियमावली तयार केली असून याचा वापर करत सामने खेळवण्यात येणार असल्याचे फुटबॉल महासंघाच्या पदाधिकाऱयांनी सांगितले. स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश नाकारण्यात आला असून या के-लीगमधील सर्व सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तसेच सोशल मीडियावरही या लीगमधील सामने दाखवण्यात येणार आहेत.

Related Stories

भारताला कोरियाने बरोबरीत रोखले

Patil_p

भारत-जॉर्डन सरावाचा फुटबॉल सामना आज

Patil_p

गेव्हिन बॅझूनू साऊदम्पटनशी करारबद्ध

Patil_p

कोल्हापूर : इचलकरंजीतील खूनी हल्ल्यातील जखमीचा मृत्यू

Archana Banage

मनिका बात्रा-साथियन मिश्र दुहेरीत विजेते

Patil_p

फ्रान्सची कॅरोलिन गार्सिया अजिंक्य

Patil_p