Tarun Bharat

सोमवारपासून पुन्हा कठोर निर्बंधांची अफवा

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव जिल्हय़ातील कोरोना बाधितांची संख्या रविवारी 107 वर पोहोचली आहे. त्यामुळे सोमवारी 11 मे पासून लॉकडाऊनचे नियम आणखी काटेकोरपणे राबविणार येतील. त्यामुळे व्यवहार बंद असतील, अशी अफवा पसरविण्यात येत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून अशा अफवा आहेत. रविवारी एका दिवसात 22 रुग्णांची भर पडल्यामुळे जिल्हय़ात लॉकडाऊनमध्ये करण्यात आलेली शिथिलता रद्द करून नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करणार, अशी चर्चा जनतेत सुरू होती. त्यामुळे बऱयाच जणांनी याचा धसका घेऊन रविवारी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती.

बेळगाव जिल्हय़ाचा समावेश ऑरेंज झोनमध्ये करण्यात आला आहे. केंद्र सरकारने ऑरेंज झोनसाठी ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार बेळगाव शहर व जिल्हय़ात लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी रोज सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेश जारी केला आहे.

सध्या सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत बेळगाव शहरासह जिल्हय़ात व्यवहार सुरू आहेत. बेळगावात तर सामाजिक अंतराची पुरती वाट लावलेली दिसत आहे. रविवारी रुग्णसंख्या वाढल्यामुळे लॉकडाऊनचे नियम आणखी कडक करणार अशी अफवा पसरविण्यात आली. यासंबंधी वरि÷ पोलीस अधिकाऱयांशी संपर्क साधला असता अद्याप तसा कोणताच आदेश आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

खोदाई कामामुळे डेनेज वाहिनीचे नुकसान

Amit Kulkarni

मुदत संपणाऱया गाळय़ांचा मनपा लिलाव करणार

Amit Kulkarni

येळ्ळूर ग्राम देवतेची आज पूजा

Patil_p

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 146 बसेस सेवेत

Patil_p

मजगावातील शर्यतीत कोलकारांची म्हैस प्रथम

Amit Kulkarni

रामतीर्थनगर वसाहतीमधील स्वच्छतेकडे बुडाचे दुर्लक्ष

Amit Kulkarni