Tarun Bharat

सोमवारी कोरोनाचे बारा नवे रुग्ण

25 हजारांहून अधिक जणांनी केली कोरोनावर मात

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोना रुग्ण संख्येत चढ-उतार सुरूच आहे. सोमवारी जिह्यातील 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये बेळगाव शहर व तालुक्मयातील 10 जणांचा समावेश आहे. एकूण बाधितांची संख्या 25 हजार 653 वर पोहोचली आहे तर 25 हजार 46 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

बेळगाव शहर व उपनगरांत सोमवारी 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर ग्रामीण भागातील एक असे तालुक्मयातील 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मोदगा, राणी चन्नम्मानगर, सदाशिवनगर, भाग्यनगर, अंजनेयनगर, मजगाव परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने सोमवारी रात्री दिलेल्या माहितीनुसार जिह्यात 266 सक्रिय रुग्ण आहेत. तर 35 हजार 634 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. आतापर्यंत 2 लाख 86 हजार 495 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे. यापैकी 2 लाख 57 हजार 797 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

कोरोनामुळे आजवर 341 जण दगावले आहेत. अद्याप 1 हजार 474 स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. आरोग्य विभागाने आतापर्यंत 2 लाख 87 हजार 586 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले आहे. गेल्या महिन्याभरापासून रुग्ण संख्येत घट सुरू आहे. मात्र गेल्या आठवडय़ापासून रुग्ण संख्येत चढउतार सुरू आहे.

Related Stories

प्रथमेश पाटील यांना रक्षा राज्यमंत्री पदकाने सन्मानित

Amit Kulkarni

लॉज व्यवस्थापकावर चाकूहल्ला

Amit Kulkarni

लॉकडाऊनच्या काळात चोरटय़ांचा मोठा डल्ला

Patil_p

स्वामी समर्थ प्रकटदिनी विद्यानगर येथे महाप्रसाद

Omkar B

अपक्ष उमेदवार बन्नूर यांची प्रचारात आघाडी

Amit Kulkarni

खानापूर बसस्थानकावर खिसेकापूंचा सुळसुळाट

Amit Kulkarni
error: Content is protected !!