Tarun Bharat

सोमवारी जिल्हय़ात 11 नवे कोरोनारुग्ण

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

सोमवारी बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोनाचे 11 नवे रुग्ण आढळून आले असून त्यापैकी बेळगाव तालुक्मयातील 8 जणांचा समावेश आहे. जिल्हय़ातील सक्रिय रुग्णांची संख्या 202 वर आली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बापट गल्ली, सदाशिवनगर, तारिहाळ, भेंडीगेरी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून बेळगाव येथील एका दंत वैद्यकीय महाविद्यालयातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यानंतर घटप्रभा, लोंढा येथेही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

आतापर्यंत जिल्हय़ातील 3 लाख 49 हजार 752 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 3 लाख 15 हजार 520 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 92 वर पोहोचली असून त्यापैकी 25 हजार 548 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप 6 हजार 219 जणांचे अहवाल यायचे आहेत.

Related Stories

बेळगुंदी शिवारात वाघसदृश प्राणी दिसल्याने खळबळ

Patil_p

आर्ट्स सर्कलतर्फे उद्या दिवाळी पहाट कार्यक्रम

Amit Kulkarni

क्रिकेटचा चेंडू चिमुकल्याचा ठरला काळ

Abhijeet Shinde

विद्यार्थ्यांनी स्वावलंबी बनण्यासाठी कला आत्मसात करावी

Amit Kulkarni

कुडची नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार

Patil_p

रोटरी क्लब ऑफ बेळगावचा अधिकारग्रहण समारंभ

Patil_p
error: Content is protected !!