Tarun Bharat

सोमवारी जिल्हय़ात 644 नवे रुग्ण

तालुक्मयातील 385 जणांचा समावेश

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. सोमवारी 644 रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे जनतेने सावध होणे गरजेचे आहे. अन्यथा मोठा फटका बसण्याची भीती आरोग्य विभागातून व्यक्त होत आहे.

सोमवारी तालुक्मयामधील 385 जणांचा नव्या रुग्णांमध्ये समावेश आहे. त्यामध्ये शहरातील 307 जणांचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील 78 जण कोरोना बाधित झाले आहेत.

रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता नागरिकांनी घरात राहणे गरजेचे आहे. गेल्या क्लोजडाऊनमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली होती. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. आता लॉकडाऊन केल्यानंतर तरी जनतेने सावध राहणे गरजेचे आहे.

दरम्यान नागरिकांनी सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळेच आपण कोरोना रोखू शकतो. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे ऑक्सिजन आणि इतर औषधांचा तुटवडा जाणवत आहे.

सोमवारी अष्टे, चंदगड, बी. के. कंग्राळी, बस्सापूर, बस्तवाड, बेनकनहळ्ळी, चव्हाट गल्ली, बेळगाव, देसूर, धामणे, गणेशपूर बेळगाव, गवळी गल्ली-बेळगाव, हलगीमर्डी, मारिहाळ, हंगरगा, हिंडलगा, हिरेबागेवाडी, होनगा, गणेशपूर, काकती, कलखांब, कंग्राळी बी.के., खादरवाडी, किणये, मच्छे, मास्तमर्डी, मुत्नाळ, पिरनवाडी, सांबरा, येळ्ळूर, अनगोळ, अंजनेयनगर, अशोकनगर, अयोध्यानगर, ऑटोनगर, बॉक्साईटरोड, भाग्यनगर, भारतनगर-खासबाग, भवानीनगर, भाग्यनगर, कॅम्प, चव्हाट गल्ली-बेळगाव, गणेशनगर, गोडसेवाडी, गुरुप्रसाद कॉलनी या परिसरात रुग्ण आढळले आहेत.

24 तासात 531 जण झाले कोरोनामुक्त 

कोरोनामुळे सोमवारी दोघांचा मृत्यू झाला आहे तर 24 तासात 531 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. जिल्हय़ामध्ये आतापर्यंत एकूण 374 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्हय़ामध्ये एकूण 39 हजार 641 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामधील 32 हजार 377 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर सध्या 6 हजार 890 जणांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

Related Stories

लोकमान्य ग्रंथालय आजपासून पूर्ववत सुरू

Amit Kulkarni

मनपाचे अधिकारी असल्याचे सांगून 3 लाखाच्या दागिन्यांची लूट

Amit Kulkarni

कारदगा येथे तिसऱया आघाडीतर्फे पेन्शन वितरण

Patil_p

ट्रक्टरवरून पडून शाळकरी मुलाचा मृत्यू

Amit Kulkarni

सुपर एक्स्प्रेस युनियन जिमखाना, साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघ विजयी

Amit Kulkarni

गॅरेजमधील टाकाऊ साहित्यातून बनविली कार

Omkar B