Tarun Bharat

सोमवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद

वृत्तसंस्था/ मुंबई

रशिया आणि युक्रेन यांच्यातील चर्चेच्या वार्तेने शेअर बाजाराने सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सावरण्याचा प्रयत्न करत महत्त्वाचे म्हणजे दोन्ही बाजारांनी तेजीसह बंद होण्यात यश मिळवलंय. टाटा स्टील, पॉवरग्रिड कॉर्पचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 388 अंकांच्या वधारासह 56247.28 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 135 अंकांच्या वाढीसह 16793.90 अंकांवर बंद झाला आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात बेलारुसमध्ये चर्चा होणार या बातमीने बाजाराने सावरत तेजीकडे प्रवास सुरु ठेवला. सेन्सेक्सने दिवसभरात एकावेळी 54833 अंकांची नीचांकी पातळी तर 56324 अंकांची उच्चांकी पातळी गाठली होती. धातू आणि आयटी कंपन्यांच्या समभागांची खरेदी मोठय़ा प्रमाणात दिसली. निफ्टीत धातू निर्देशांक 4.75 टक्के इतका मजबूत दिसला. एफएमसीजी आणि फार्मा निर्देशांक तेजीसोबत बंद झाले. बँक, ऑटो आणि वित्तसंबंधीत निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. सेन्सेक्समधील 30 पैकी 18 कंपन्यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत. यामध्ये टाटा स्टील, पॉवरग्रिड, टायटन, रिलायन्स, एनटीपीसी आणि एल अँड टी यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.

दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत बॅरलमागे 102 डॉलरवर पोहचली आहे. रशिया-युक्रेन संकटामुळे तेलाच्या पुरवठय़ाबाबत चिंता वाढली आहे. प्रुड कच्चे तेल 1 वर्षात 66 टक्के आणि यावर्षी 32 टक्के इतके महागले आहे. लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल शुक्रवारी 250.07 लाख कोटी इतके होते. जे सोमवारी 252.36 लाख कोटी इतके राहिले होते.

आशियाई बाजारात मात्र तेजीचा सूर दिसला. यात निक्केई 50 अंकांनी, कोस्पी 22 अंकांनी, शांघाई 10 अंकांनी वधारला होता तर हँगसेंग मात्र 54 अंकांनी घसरल्याचे दिसून आले.

Related Stories

फेब्रुवारीमध्ये 38 हजार नागरिकांचा विमान प्रवास

Tousif Mujawar

मयत रुग्णाची हेळसांड झाल्याने वडूज ग्रामीण रुग्णालयात तणाव

Archana Banage

राशी भविष्य

Patil_p

हिरो मोटोकॉर्पची भारत पेट्रोलियमशी हातमिळवणी

Patil_p

श्री श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजींची बेळगाव मधील विविध समाजातील प्रमुखांशी भेट

Rohit Salunke

चामराजनगर घटना : जिल्हा न्यायाधीशांनी परिस्थितीचा घेतला आढावा

Archana Banage