Tarun Bharat

सोमवारी रुग्ण संख्येत किंचित वाढ

प्रतिनिधी/ बेळगाव

गेल्या 15 दिवसांपासून बेळगाव शहर व जिह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली होती. रोज केवळ 20 ते 30 या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत होते. सोमवारी रुग्ण संख्येत किंचित वाढ झाली असून जिह्यातील 65 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर बेळगाव, अथणी येथील दोघे जण दगावले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या 32 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.

सोमवारी नागिराळ, गणेशपूर, गजपती, बाळेकुंद्री खुर्द, मच्छे, रामतीर्थनगर, हिंदवाडी, कल्याणनगर-वडगाव, महांतेशनगर, मजगाव, पोलीस क्वॉर्टर्स परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. बेळगाव शहर व उपनगरांतील 11, ग्रामीण भागातील 7 असे तालुक्मयातील 18 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

बेळगाव परिसरातील 30 वषीय युवक व अथणी येथील एका 60 वषीय वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 340 वर पोहोचला आहे. तर सोमवारी जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 24 हजार 983 वर पोहोचली असून यापैकी 24 हजार 184 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

जिह्यात सध्या केवळ 461 सक्रिय रुग्ण आहेत. प्रशासनाला आणखी 2 हजार 478 अहवालांची प्रतिक्षा आहे. अद्याप 27 हजार 897 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. आतापर्यंत 2 लाख 38 हजार 301 स्वॅब तपासणी करण्यात आली असून यापैकी 2 लाख 9 हजार 441 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

रोज 20 ते 25 असलेला आकडा अचानक सोमवारी 65 वर पोहोचला आहे. दिवाळीत मास्क, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर, व्यवस्थीतपणे पाळले गेले नाही तर रुग्ण संख्येत आणखी वाढ होण्याची भिती आहे. आरोग्य विभागाकडून रोज दोन ते अडीच हजार जणांची स्वॅब तपासणी करण्यात येत आहे. दिवाळीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

Related Stories

खानापुरात नवरात्रोत्सवाला भक्तिभावाने प्रारंभ

Amit Kulkarni

बाळासाहेब पाटील यांना आंतरराज्य पुरस्कार

Patil_p

सजविलेल्या म्हशींची मिरवणूक उत्साहात

Omkar B

शिवप्रतिष्ठानतर्फे शिवजन्मोत्सव साधेपणाने साजरा

Patil_p

शिवसेना नेत्यांवर बेळगावात एफआयआर

Patil_p

सिंह घराघरात पोहचला, आता मतदानपेटीपर्यंत पोहचवा

Omkar B