Tarun Bharat

सोमवारी सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन

दूध, औषधे, दवाखाने असणार सुरू

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोना महामारी थोपविण्यासाठी शनिवारी सकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. एम. जी. हिरेमठ यांनी यासंबंधी आदेश जारी केला असून लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवा असणार आहेत.

बेळगाव शहर व जिल्हय़ात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर फैलाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शनिवार दि. 22 मे च्या सकाळी 6 पासून सोमवार दि. 24 मे च्या सकाळी 6 पर्यंत जिल्हय़ात संपूर्ण लॉकडाऊनचा आदेश काढला आहे.

इस्पितळे, दवाखाने, औषध दुकाने, दूध आदी अत्यावश्यक सेवा असणार आहेत. उपचारासाठी लॉकडाऊनच्या काळात गरजूंना दवाखान्याला जाता येणार आहे. आंतरराज्य व आंतरजिल्हा मालवाहतूक सुरू असणार आहे. या काळात आधीच परवानगी घेतलेल्या कार्यक्रमांना मुभा असणार आहे.

लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध भारतीय दंडसंहिता 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱयांनी दिला असून लॉकडाऊनच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीसप्रमुख, प्रांताधिकारी व तहसीलदारांवर सोपविण्यात आली आहे. महामारी थोपविण्यासाठी केलेल्या या उपाययोजनांना नागरिकांनी प्रतिसाद द्यावा. अनावश्यकपणे कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.

Related Stories

कंग्राळी-अलतगा भागात कापणी-मळणीला वेग

Amit Kulkarni

कुडची नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार

Patil_p

मलाबार गोल्ड ऍण्ड डायमंड्सच्या 24 व्या शोरूमचा शुभारंभ

Patil_p

शहरात सर्वत्र रथसप्तमी साजरी

Amit Kulkarni

सख्ख्या भावानेच केला लहान भावाचा खून

Omkar B

स्टेट कंझ्युमर फोरम बेळगाव ऐवजी गुलबर्ग्याला

Tousif Mujawar