Tarun Bharat

सोमवार पेठेत ६ लाखांची घरफोडी

सातारा / प्रतिनिधी : 

शहरातील सोमवार पेठेत चोरट्याने बनावट चावीच्या सहाय्याने कपाट उघडून कपाटातील ५ लाख ७८ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली असून, याची नोंद शाहुपूरी पोलीस ठाण्यात झाली आहे.  

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की ज्योती जयकुमार पाटणकर (वय ४८,रा. सोमवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरातील कपाटातून अज्ञात चोरट्याने दि. २० फेब्रुवारी २०२१ ते दि. ३० मे २०२१ या दरम्यान ५ लाख ७८ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. यामध्ये २ लाख रुपयांचे ५ तोळयाचे ब्रेसलेट, ८० हजार रुपयांची दोन तोळय़ाची साखळी, ८० हजार रुपयांची दोन तोळय़ाची अंगठी, १२ हजार रुपयांची तीन ग्रॅमची सोन्याची मूर्ती, १ लाख २० हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगडय़ा, २० हजार रुपयांचे पाच ग्रॅमचे सोन्यांचे गंठण, ३८ हजार रुपयांचे ९.५ ग्रॅमचे दोन सोन्याचे पेंडण, १२ हजार रुपयांचे तीन ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या साखळ्या, ४ हजार रुपयांचे पेंडण, १२ हजार रुपयांची सोन्याची अंगठी, असा एकूण ५ लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने बेडरुममधील गोदरेजच्या कपाटा डुब्लीकेट चावीने उघडून कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेला किमती माल चोरुन नेला आहे. पोलीस हवालदार दबडे हे तपास करत आहेत.

Related Stories

भरोसा सेलने रोखला बालविवाह

datta jadhav

साताऱयातील होम आयसोलेशन बंद करणार

Amit Kulkarni

सातारा प्रति सरकारचे स्मारक ठिकठिकाणी उभे करा; प्रा. मच्छिंद्र सकटे यांची मागणी

Archana Banage

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल

Archana Banage

कास पठारावर पर्यटकांचा ओघ वाढला

datta jadhav

फोंडय़ातील काही नेते परस्परांची उणीधुणी काढण्यातच मश्गुल

Patil_p