मोगादिशू
पूर्व आफ्रिकेतील सोमालिया देश हा सध्याला तीव्र दुष्काळामुळे होरपळतो आहे. या देशातील 20 लाख जणांना अन्न, पाण्याची टंचाई भेडसावताना दिसते आहे. यासंदर्भातील माहिती संयुक्त राष्ट्राने नुकतीच दिली आहे. सोमालिया देश हा नेहमीच एक ना अनेक संकटातून जात असताना दिसतो आहे. सध्याला या देशात भीषण दुष्काळ पडला असून पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यासोबत अन्नाची टंचाईही जाणवत असल्याची बाब समोर आली आहे. पाण्याचे स्त्राsत आटत चालल्याने पाण्याच्या गंभीर टंचाईला नागरिकांना तोंड द्यावे लागते आहे. सलग चौथ्या हंगामात पुरेशा पावसाअभावी हा देश दुष्काळाचा सामना करतो आहे. जवळपास 1 लाख लोकांनी पाणी, अन्नासाठी घर सोडले असल्याचे समजते. पुढील वर्षापर्यंत पाणी-अन्नाविना राहणाऱयांची संख्या 80 लाखावर पोहचणार असल्याचा इशाराही संयुक्त राष्ट्राने दिला आहे.