Tarun Bharat

सोयाबीन खरेदीत अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदान

प्रतिनिधी/ खंडाळा

सोयाबीन बियाणे खरेदीवर डि. बी. टी. पध्दतीने तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची माहीती तालुका पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे यांनी दिली.

खरीप हंगामात जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. दरम्यान खंडाळा पंचायत समिती मार्फत या योजनेचे अनुदान दिले जाणार असून सोयाबीन बियाणे खरेदीवर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे मागणी अर्ज सादर करावा. त्या सोबत जमिनीचा खाते उतारा, सात- बारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक यांची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. मात्र पुर्व संमती घेऊन सोयाबीन खरेदी ही अधिकृत कृषी सेवा केंद्रातुन शेतकऱ्यांनी करावी. या योजनेत एकरी तीस किलो सोयाबीनचे बियाणे खरेदी करता येईल.तर प्राधान्य क्रमाने अनुदान मर्यादेपर्यंत ही योजना राबविण्यात येणार आहे. तरी खंडाळा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती तांबे यांनी केले आहे.

Related Stories

‘राजधानी सातारा’ सेल्फी पॉईंटवर गर्दी

Amit Kulkarni

खंबाटकी बोगद्यात भीषण अपघात; 2 जागीच ठार, 5 जखमी

datta jadhav

शिवाजी विद्यापीठाची प्रगती नेत्रदीपक; डॉ. मृणालिनी फडणवीस यांचे गौरवोद्गार

Abhijeet Khandekar

परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्याची स्पर्धा परीक्षार्थींची मागणी

datta jadhav

स्थलांतरीत कामगारांसाठी उद्योग भवन सांगलीत सुविधा केंद्र सुरू

Archana Banage

सातारा शहरात कडक टाळेबंदी

Patil_p