Tarun Bharat

सोया पुरी

साहित्य : 2 चमचे बारीक चिरलेली मेथीची पाने, 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे सोयाबीन पीठ, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, अर्धा चमचा काळे तीळ, पाव चमचा लाल तिखट पावडर, चिमुटभर हळद पावडर, चवीपुरते मीठ, लाटण्यासाठी गव्हाचे पीठ, तेल तळण्यासाठी 

कृती : बाऊलमध्ये गव्हाचे पीठ चाळून घ्यावे. नंतर त्यात सोयाबीन पीठ, काळे तीळ, लाल तिखट पावडर, हळद पावडर, मीठ, मेथीची पाने, कोथिंबीर आणि चमचाभर तेल घालून मिश्रण मिक्स करावे. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याचा गोळा मळून पंधरा मिनिटे ठेवावा. नंतर पुन्हा गोळा मळून त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवावेत. पोळपाटावर गव्हाचे कोरडे पीठ पसरवून त्याची गोलाकार पुरी लाटावी. त्यावर टोकदार चमचाच्या सहाय्याने हलक्यावर टोचे मारावेत. कढईत तेल गरम करावे. तेल चांगले गरम झाले की त्यात तयार पुरी हलक्या सोनेरी रंगावर तळावी. आता तयार पुरी आवडत्या भाजीसोबत अथवा अशीच सुकी खाण्यास द्या.

Related Stories

ओट्स डोसा

Omkar B

घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शीर खुरमा

Kalyani Amanagi

मस्त खुसखुशीत बेसन वडी खायचीयं; जाणून घ्या रेसीपी

Archana Banage

खुसखुशीत आणि स्वादिष्ट मटार कचोरी

Kalyani Amanagi

ब्रेड कोफ्ता राईस

Omkar B

या उन्हाळ्यात बनवा वर्षभर टिकणारी दही गवार

Kalyani Amanagi
error: Content is protected !!