Tarun Bharat

सोलापूर : मराठा आक्रोश मोर्चा; कोणत्याही परिस्थितीत निघणारच

माजी आमदार नरेंद्र पाटील करणार नेतृत्व; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर :

आक्रोश मोर्चासाठी मराठा बांधव छत्रपती संभाजी महाराज चौकात जमण्यास सुरुवात

मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणी बरोबरच विविध मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापुरात आज रविवारी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळपासूनच छत्रपती संभाजी महाराज चौकात मराठा बांधव जमण्यास सुरुवात झालेली आहे. यावेळी बांधवांकडून आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे असं कसे देत नाही घेतल्याशिवाय राहात नाही, सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है ,जय भवानी ,जय शिवाजी अशा घोषणा देत येथील परिसर दणाणून गेला, या शहरात सर्व ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कोणत्याही परिस्थितीत अकरा वाजता मोर्चा निघणारच

महाविकास आघाडी सरकारकडून पुन्हा एकदा मराठ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. शहरात विविध ठिकाणी नाकेबंदी करून मराठा बांधवासह विविध जाती धर्मातील लोकांना मोर्चा मध्ये येऊ देत नाहीत. काही झाले तरी अकरा वाजता मोर्चा निघणारच सर्व जाती धर्मातील लोकांनी मोर्चा मध्ये सामील व्हावे असे आवाहन कै. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.

अण्णासाहेब आर्थिक महाविकास मंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील

Related Stories

सीमावाद चिघळला; महाराष्ट्र-कर्नाटकदरम्यानची बससेवा पुन्हा बंद

datta jadhav

पत्रकारांचे शरद पवारांना साकडे

Archana Banage

ससूनमध्ये लैंगिक अत्याचार पीडितांना साह्यासाठी एक खिडकी योजना

prashant_c

अकलूज, कुंभारी, बार्शीतील तीन दवाखाने कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित

Archana Banage

लॉकडाऊन नियमांचा भंग; सोलापूर जिल्ह्यात १ कोटी ८४ लाखांचा दंड वसूल

Archana Banage

ट्रॅक्टर व मोटरसायकलची धडक, शिक्षक जागीच ठार

Abhijeet Khandekar