Tarun Bharat

सोलापुरात आणखी 1 कोरोनाचा रुग्ण; संख्या 13 वर

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

शहरातील जोशी गल्ली, रविवार पेठेत शुक्रवारी कोरोनाचा नवा एक रुग्ण आढळला असून शहरातील कोरोनाच्या रुग्णाची एकुण संख्या १३ झाली आहे. यातील 1 रुग्ण मृत पावला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शुक्रवारी दिली.
रविवार पेठेतील जोशी गल्ली येथे राहणारा हा रुग्ण मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे. आठ दिवसांपूर्वी तो सोलापुरात आला होता. त्याच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारला होता. त्याला बरे वाटत नसल्याने तो तीन दिवसांपूर्वी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. यावेळी त्याचे स्वॅब घेण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी त्याचा अहवाल पॉझीटिव्ह आल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

शहरात आठ दिवसापूर्वी कोरोनाचा पहिला रुग्ण पाच्छा पेठ सापडला होता. त्या रुग्णाच्या संपर्कातील १४८ जणांचे स्वब घेतल्यानंतर २ दोन जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यातील एका महिलेच्या संपर्कातील ९ जणांचा कोरोनाची लागण झाली होती. शुक्रवारी रविवार पेठेतील जोशी गल्लीमध्ये रुग्ण आढळून आला आहे. हा परिसर सील केला आहे. तर त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू आहे.

सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती
-एकूण होम क्वारंटाईन : 1 हजार 626
-14 दिवसाचा कालावधी पूर्ण : 545
-अजूनही होम क्वॉरंटाईनमध्ये : 1087
-इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये : 1 हजार 2
-14 दिवसाचा कालावधी पूर्ण : 289
-अजूनही इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये : 713
-विलगीकरण कक्षात ऐडमिट : 646
-एकूण अहवाल प्राप्त : 486
-आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 473
-आतापर्यंतअहवाल पॉझीटीव्ह : 13
-नव्याने पॉझीटीव्ह : 01
-मृत : 01
-अहवाल येणे बाकी : 160

Related Stories

किल्ले सज्जनगड बुरुज स्वच्छता मोहीम फत्ते

Archana Banage

मला फडणवीसांचे महत्त्व वाढवायचे नाही

datta jadhav

सातारच्या मुख्याधिकारीपदी रंजना गगे

Patil_p

वाळवा तालुक्यात एका दिवसात १८ जण पॉझिटिव्ह

Archana Banage

लताजींना अनोखी श्रद्धांजली

Patil_p

कोरोनाबाधित कामगारांनी ईएसआय योजनांचा लाभ घेण्यासाठी तात्काळ अर्ज करा

Archana Banage