तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरात नव्याने 18 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 10 पुरुष, 8 स्त्रियांचा समावेश आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून 34 वा बळी कोरोनाने घेतला आहे. आज 35 तर आतापर्यंत 210 व्यक्ती बरे होऊन घरी गेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 488 वर पोहचली आहे. उर्वरित 244 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी दिली.
आज मृत झालेले 74 वर्षाचे पुरुष सदर बझार लष्कर परिसरात राहत होते.17 मे दरम्यान उपचारासाठी सिव्हीलमध्ये दाखल झाली होते. उपचारा दरम्यान मृत पावले. त्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव आला आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये अशोक चौक 1, न्यू पाच्छा पेठ 3, उत्तर कसबा पत्र तालीम 1, कुरबान हुसेन नगर 1, केशव नगर झोपडपट्टी 1, धुम्मा वस्ती भवानी पेठ 1,नीलम नगर 1, सिव्हिल हॉस्पिटल कॉर्टर 1, बेगम पेठ 1, बुधवार पेठ 1 , न्यू बुधवार पेठ 1, कुमार स्वामी नगर 1, रेल्वे लाइन्स 1, कुमठा नाका 1,बाळीवेस 1,पाच्छा पेठ 1 या भागातील नवीन रुग्ण आढळले आहेत.
आज एकूण 183 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 165 जणांचा रिपोर्ट निगेटिव आला तर 18 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत 488 कोरोनाबधितची संख्या झाली आहे. यामध्ये 272 पुरुष तर 216 स्त्री आहेत. 244 रुग्ण सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 34 व्यक्ती मृत झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 210 जणांना घरी सोडण्यात आले आहेत.
सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती – होम क्वांरटाईन- 7157-एकूण अहवाल प्राप्त : 5014-आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 4526-आतापर्यंत अहवाल पॉझीटीव्ह : 488- उपचार सुरू- 244- बरे होऊन घरी गेले : 210- मृत- 34

