Tarun Bharat

सोलापुरात एकाच दिवशी 21 नवीन कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळले

तरुण भारत संवाद, प्रतिनिधी / सोलापूर


सोलापुरात कोरोनाबाधित आणखी 21 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 14 पुरुष, 7 महिलांचा समावेश आहे. सोलापुरात कोरोनाची संख्या 102 वर पोहोचली  आहे. आजपर्यंत सहा जणांचा मृत्यू  झाला आहे.  उर्वरित 96  जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये  उपचार सुरु असल्याच. माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज गुरुवारी दिली. आज आढळलेल्या रुग्णांपैकी  शास्त्रीनगर 5,  शानदार चौक 9, मोदी 4, सदर बझार 1, नई जिंदगी 1, कुरबान हुसेन नगर 1, शनिवार पेठ , असे एकूण 21 नवीन कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.आज एकूण  205 अहवाल प्राप्त झाले होते त्यापैकी 184 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले  तर उर्वरित 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सोलापुरातील आयसोलेशन वार्डात 1650 व्यक्ती होते त्यापैकी 1455 जणांचे अहवाल प्राप्त झाला असून, यापैकी 1353 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर 195 व्यक्तीचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. एकूण  102  व्यक्ती पॉझिटिव्ह  आढळले आहेत. सोलापुरात नव्याने 21 कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यामुळे व कोरणा बाधित रुग्णांचा आकडा 100 हुन अधिक झाल्यामुळे सोलापुरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Related Stories

कर्नाटक उपमुख्यमंत्र्यांचे आव्हान शिवसेनेने स्विकारले : मंत्री उदय सामंत

Archana Banage

Solapur : परांडा आरोग्य शिबिरासाठी करमाळा तालुक्यातून वाहतूक व्यवस्था

Abhijeet Khandekar

ज्येष्ठ नाटककार, लेखक जयंत पवार काळाच्या पडद्याआड

Archana Banage

Kolhapur; संभाजीराजेंची परिवर्तन क्रांतीची घोषणा

Abhijeet Khandekar

वहागावात युवकाचा खून करून मृतदेह शेतात पुरला

Patil_p

ढोणे कॉलनीत युवतीच्या डोक्याला लावली पिस्तुल

Patil_p