Tarun Bharat

सोलापुरात नव्याने सात कोरोना बाधित रुग्णांची भर

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापुरात  शुक्रवारी नव्याने 7 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 4 पुरुष, 3 स्त्रियांचा समावेश आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 337 वर पोहचली आहे. उर्वरित  व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर  यांनी शुक्रवारी दिली. 

आज, शुक्रवारी एकूण 74 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 67 जणांचा रिपोर्ट निगेटिव आला तर 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण 3355 सणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 3228 जणांचे रिपोर्ट आले आहेत.  कोरोनाबधितची संख्या 337 वर गेली आहे.  कोरोनामुक्त झालेल्या 106  जणांना घरी सोडण्यात आले आहेत. ही आकडेवारी शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत असून उर्वरित माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सायंकाळी देणार आहेत. 

सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती 
-एकूण अहवाल प्राप्त : 3555
-आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 3218
-आतापर्यंत अहवाल पॉझीटीव्ह : 337

  • बरे होऊन घरी गेले : 106
  • मृत- 22

Related Stories

10 वी, 12 वी च्या पुरवणी परीक्षांचे निकाल जाहीर

Tousif Mujawar

चौके परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही कोरोना रुग्ण

Archana Banage

भीषण अपघातात पोळ कुटूंबातील तिघे ठार

Patil_p

आगामी गळीत हंगामात सात लाख टन ऊस गाळपचे उद्दिष्ट : अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर

Archana Banage

सिव्हिलमध्ये मृतदेह सोडून नातेवाईक झाले गायब

Patil_p

Kolhapur; राजर्षी शाहूंची जयंती लोकोत्सव म्हणून साजरा करणार

Abhijeet Khandekar