Tarun Bharat

सोलापुरात बुधवारी २९ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती 

सोलापूर / प्रतिनिधी

सोलापुरात नव्याने 29 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 20 पुरुष आणि 9  स्त्रियांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 653 वर पोहचली आहे. उर्वरित  व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी दिली.

आज बुधवारी सकाळी 128 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यातील 29  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर  99 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. एकाचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत एकूण 6 हजार 18 जणांचे तपासणी करण्यात आली. यातील 5365  जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 653 अहवाल पॉझिटिव आले आहे.  एकूण 64 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 279 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ही आकडेवारी सकाळी 8 वाजेपर्यंत ची आहे. उर्वरित माहिती जिल्हाधिकारी शंभरकर संध्याकाळी देणार आहेत.

Related Stories

महाराष्ट्रात मागील 24 तासात 4,355 नवे कोरोनाबाधित

Tousif Mujawar

बांग्लादेशातून बनावट नोटांची तस्करी, पुण्यात तिघांना अटक

datta jadhav

लुत्सी श्वानाच्या डोहाळजेवणाचे वाईच्या लेकीने केले सोपस्कार

Patil_p

नामुष्की टाळण्यासाठी गावस्करांचा मोठा निर्णय, 33 वर्षांनी…

datta jadhav

देशात कौशल्य विकासावर आधारित शिक्षण हवे

Patil_p

जायंट्स सखीचा आज अधिकारग्रहण

Patil_p