Tarun Bharat

सोलापुरात मटका टोळी दोन वर्षासाठी तडीपार

प्रतिनिधी तरुण भारत संवाद / सोलापूर

शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मटका टोळीला गुरुवारी शहर आणि जिह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. जेलरोड पोलीस ठाण्याच्या वतीने ही प्रभावी कामगिरी करण्यात आली आहे.

 याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविंद्र उर्फ बंडू उमाकांत मुसळे हा काही वर्षापासून मटका व्यवसायात गुंतलेला आहे. त्याने हा व्यवसाय शहरात वाढविण्यासाठी इतर लोकांचीही नेमणूक केली होती. त्याने अवैध व्यवसाय बंद करावा, म्हणून पोलिसांनी यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाया केल्या होत्या. परंतु त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. दरम्यान पोलीस आयुक्त शिंदे यांनी शहर परिसरातील बेकायदा व्यवसायावर कारवाईचे आदेश शहर पोलिसांना दिले होते. त्या अनुषंगाने शहरातील विविध भागात सुरु असलेल्या मटका व्यवसायावर संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱयांकडून कारवाईचे सत्र सुरुच होते.

दरम्यान प्रतिबंधात्मक कारवाई करुनही पुन्हा मटका व्यवसाय जोमाने करणाऱया बंडू मुसळे व त्यांच्या टीमविरुध्द जेलरोड पोलिसांनी तडीपार करण्याचा प्रस्ताव परिमंडळ कार्यालयास सादर केला होता. याची पडताळणी केल्यानंतर पोलीस उपायुक्त परिमंडळाने मुसळे व त्याच्या साथीदारांना सोलापूर शहर तसेच जिह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार गुरुवारी रविंद्र मुसळे याच्यासह म. शरीफ अ. रहेमान बागवान (वय 38, रा. बेगम पेठ, सोलापूर), सिध्दारुढ मलकप्पा तांबे (वय 52, रा. बनशंकरी नगर, शेळगी, सोलापूर), सिध्दाराम चंद्रकांत गब्बुरे (वय 32, रा. गवळी वस्ती, एमआयडीसी  रोड, सोलापूर) यांना गुरुवारी तडीपार करण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ) बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त कमलाकर ताकवले, जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जफर मोगल, दुय्यम पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार, पोलीस हवालदार शरीफ शेख, फरीद शेख, पोलीस शिपाई तुकाराम बंदीछोडे, श्रीधर काळे, विशाल बनसोडे, मल्लिकार्जुन चमके यांनी केली.

Related Stories

महाआरोग्य शिबिराची तयारी पूर्ण

Archana Banage

ओबीसी मंत्र्यांनी राजीनामा देऊन सरकारवर दबाव टाकावा

Archana Banage

सोलापूर जिल्ह्यात महिनाभरात १० हजार ९२९ नवे कोरोना रुग्ण

Archana Banage

एस.टी. बँकेतील कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात ५८ वरून ६० वर्ष करण्यास इंटकचा विरोध

Archana Banage

निवडणुकीमुळे सोलापुरात उद्यापासून तीन दिवस मद्य विक्री बंद

Archana Banage

सोलापूर : दर निश्चितीच्या विरोधात डॉक्टरांकडून ‘मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन’च्या प्रतिकृतींची होळी

Archana Banage