Tarun Bharat

सोलापूर शहरात 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, 9 जणांचा मृत्यू

बरे झालेल्या 18 रुग्णांना सोडले घरी

तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर

सोलापूर शहारात रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर 9 जणांचा मृत्यू झाला. तसेच उपचार घेऊन बरे झाल्याने आज 18 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

आज, रविवारी 222 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 39 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 283 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 39 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 28 पुरुषांचा तर 11 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1930 झाली आहे. तसेच उपचारादरम्यान 9 जणांचा मृत्यू झाला.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 10476
सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 1930
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 130
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 718
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 1042
-प्राप्त तपासणी अहवाल : 10476
-प्रलंबित तपासणी अहवाल : 00
-निगेटिव्ह अहवाल : 8546

Related Stories

बिबट्या मादी व बछड्याची भेट कॅमेऱ्यात कैद

Abhijeet Khandekar

बहिणीच्या लग्नासाठी गावाकडे परतताना भावाचा अपघाती मृत्यू

Abhijeet Khandekar

देशात उपासमारीची स्थिती चिंताजनक

Archana Banage

करवीरकराना हवं आहे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद

Archana Banage

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी १ लाख मोबाईल सरकारला परत करण्याचा घेतला निर्णय

Archana Banage

महत्वाची बातमी! कर्ज महागणार, रेपो दरात अर्धा टक्क्यांची वाढ

Rahul Gadkar