Tarun Bharat

सोलापुरात शुक्रवारी साजरी होणार ‘रमजान ईद’

Advertisements

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  ईद-उल-फित्रची  नमाज घरातच अदा करा

सोलापूर / प्रतिनिधी

मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईदसाठी आज बुधवार 12  मे रोजी  चंद्रदर्शन  न झाल्यामुळे उद्या गुरुवारी 13  मे रोजी  30 वा रोजा (उपवास ) पूर्ण करून  शुक्रवार 14 मे रोजी ईद उल फित्र साजरी होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ईदची ईदगाह मैदानावर होणार नसून मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरातच अदा करावी असे आवाहन सोलापूरचे शहर काझी , रुयते हिलाल कमिटीचे सय्यद अहमदअली निजामी यांनी केले. 

        कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.  जिल्ह्यात ही कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत  रमजान ईदची नमाज ईदगाह मैदानावर होणार नाही. कोरोनाचे नियम पाळत मुस्लिम बांधवांनी नमाज घरातच अदा करावी.  ईदच्या दिवशी शुभेच्छा देताना हात व आलिंगन देऊन नये, यंदाची ईद साधेपणाने करा आणि गरजूंना मदत करा असे आवाहन शहर काझी यांनी केले आहे. 

Related Stories

वाळू वाहतूक करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास सेवेतून बडतर्फ

Abhijeet Shinde

पंकजा मुंडेंचे आंदोलन भाजपकडून ‘हायजॅक’

prashant_c

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथील

Abhijeet Shinde

कुर्डुवाडी उड्डाणपुलाबाबत मध्य रेल्वेची कोणतीच हरकत नाही

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात 57 तर ग्रामीणमध्ये 848 नवे कोरोना रुग्ण

Abhijeet Shinde

बार्शीत पोलीस कर्मचाऱ्या सह पत्नीही कोरोना बाधित, रोजची हजेरी ऑनलाईन घ्यावी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!