Tarun Bharat

मराठा समाजबांधव संतापले

Advertisements

पंढरीत अर्धनग्न मुंडन आंदोलन, सोलापुरात निदर्शने

सोलापूर / तरुण भारत संवाद प्रतिनिधी

मराठा समाजाचे न्यायालयात आरक्षण रद्द झाले. यानंतर मराठा समाज आक्रमक झाला. आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी पंढरपुरात अर्धनग्न होऊन मुंडन आंदोलन केले. तर सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱयांनी एकत्र येऊन शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला दिलेले आरक्षण रदद केले. यानंतर राज्यभरात मराठा आंदोलनक आक्रमक झाले. यामध्ये पंढरपूरातील सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. सुमारे 100 मराठा कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी अर्धनग्न होऊन आंदोलन केले. यामध्ये मराठा ठोक मोर्चाचे रामभाऊ गायकवाड यांच्यासह इतरही कार्यकर्त्यानी छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी मुंडण करून निषेध केले. पूर्वीच्या फ्ढडणवीस आणि सध्याच्या ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला आहे.

  या आंदोलनात किरणराज घाडगे, महेश डोंगरे, स्वागत कदम, धनंजय मोरे, सुमित शिंदे, संदिप मुटकुळे, संतोष कवडे, शशिकांत पवार, बापू शिंदे, संदिप मांडवे, समाधान शिंदे आदी मराठा कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सोलापूर शहरातही सकल मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मराठा आरक्षण रद्द झाल्याबद्दल केंद्र व राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, भाऊ रोडगे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनामुळे परिसरात काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यानंतर मराठा समाजाकडून राज्य व केंद्र सरकार विरोधात सोशल मीडियावर नाराजीचा सूर व्यक्त होत होता. दुपारी बाराच्या सुमारास सोलापूर शहरातील एसटी बस स्टँड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळÎासमोर सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार व भाऊ रोडगे दाखल झाले. मुंडन केलेल्या तीन मुलांना सोबत घेऊन सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. फौजदार चावडी पोलिसांनी माऊली पवार आणि भाऊ रोडगे यांना ताब्यात घेतले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा निकालाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात प्रत्येक चौकामध्ये व संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. दंगा नियंत्रण पथकाच्या गाडÎा तैनात ठेवल्या होत्या. शहरात दिवसभर तणावपूर्ण शांतता दिसून आली.

सोलापुरात दोघांना घेतले ताब्यात

मराठा आरक्षण निकालाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शहरात पोलिसांची गस्त  वाढविण्यात आली होती. निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, धर्मवीर संभाजी महाराज चौकासह परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान निकालानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

माऊली पवार, भाऊसाहेब रोडगे असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  त्यानंतर त्यांना फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्यांची नोटीस देऊन सुटका करण्यात आली. दरम्यान मराठा आरक्षणाच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयात बुधवारी निर्णय होणार होता. यामुळे शहरातील विविध भागात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली होती. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने पुकारण्यात आलेल्या संचारबंदीसाठीचा पोलिसांचा बंदोबस्त आहे. परंतु, मराठा आरक्षण निर्णयामुळे बुधवारी पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. त्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, चार पुतळा चौक, नवीपेठ, धर्मवीर संभाजी महाराज चौक याठिकाणी पोलिसांची मोठी कुमक तैनात केली होती. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट व त्याचे पथक संवदेशनशील ठिकाणांची माहिती घेत होते. तसेच रस्त्यावरुन येणाऱया-जाणाऱयांची कसून चौकशी करताना दिसत होते.

दरम्यान, शहरातील संवदेशनील भागात पोलिसांचे पेट्रोलिंग वाढविण्यात आले होते. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. निकालानंतर शहर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीही पोलीस दल सज्ज झाले होते. सकाळपासूनच वरिष्ठ अधिकारी शहर परिसरात लक्ष ठेवून होते. आंदोलन होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांवर पोलीस लक्ष ठेवून होते.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील परिस्थितीची पाहणी केली.  त्याचबरोबर पोलीस उपायुक्त (परिमंडळ) वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त (गुन्हे) बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) अभय डोंगरे यांनीही शहरातील विविध भागात फिरुन माहिती घेतली.

Related Stories

सोलापूर शहराला चार तर हद्दवाढ भागाला पाच दिवसाआड पाणीपुरवठा

Archana Banage

वैरागमध्ये कोरोना विळख्यातच प्रशासनाचा सावळा गोंधळ

Archana Banage

यंदा इसबावी ते पंढरपूर प्रातिनिधीक पायी वारीला परवानगी

Archana Banage

सोलापूर : ‘म्युकर मायकोसिस’वरील इंजेक्शन मिळेना

Archana Banage

सोलापूर : बॅडमिंटन,जलतरण खेळास परवानगी : जिल्हाधिकारी

Archana Banage

एमआयएमचा अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांना पाठिंबा

Archana Banage
error: Content is protected !!