Tarun Bharat

सोलापुरात 150 जण झाले कोरोनामुक्त, 21 नव्या रुग्णांची भर

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 364 वर, 190 रुग्णांवर उपचार सुरू

तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर

सोलापुरात नव्याने 21 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 9 पुरुष, 12 स्त्रियांचा समावेश आहे. आज 37 तर आतापर्यंत 150 व्यक्ती बरे होऊन घरी गेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 364 वर पोहचली आहे. उर्वरित 190 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

आज आढळलेल्या रुग्णांपैकी शुक्रवार पेठ 1, अशोक चौक 2, जुना कुंभारी नाका 2, अलकुंठे चौक 1, लष्कर 2, न्यू पाच्छा पेठ 1, कुमठा नाका 4, गीता नगर 3, एकता नगर1, साईबाबा चौक 2, तुळशी नगर 1, नाथ संकुल,सदर बझार 1 या भागातील नवीन रुग्ण आढळले आहेत.

आज एकूण 234 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 213 जणांचा रिपोर्ट निगेटिव आला तर 21 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आज एकूण 3820 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 3456 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबधितची संख्या 364 वर गेली आहे. आतापर्यंत 364 कोरोनाबधितची संख्या झाली आहे. यामध्ये 197 पुरुष तर 167 स्त्री आहेत. 190 रुग्ण सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 24 व्यक्ती मृत झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 150 जणांना घरी सोडण्यात आले आहेत

सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती

होम क्वांरटाईन-4738

एकूण अहवाल प्राप्त : 3820

आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 3456

आतापर्यंत अहवाल पॉझीटीव्ह : 364

उपचार सुरू- 190

बरे होऊन घरी गेले : 150

मृत- 24

Related Stories

Sangli; जिल्हय़ातील ५० घरफोड्या उघडकीस

Abhijeet Khandekar

भारतीय रेल्वेने रचला इतिहास!

Tousif Mujawar

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, 5 ठार, 5 जखमी

Tousif Mujawar

धक्कादायक: एकाच दिवशी बार्शीत ३६ कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा सपाटा सुरुच

Archana Banage

शरद पवार ‘मविआ’च्या सभेला संबोधित करणार

datta jadhav
error: Content is protected !!